AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : धोनीने जे म्हटलं, त्याने रोहित शर्माला भरुन आलं, प्रतिक्रिया देताना म्हणाला….

Rohit Sharma : T20 वर्ल्ड कप 2024 चा किताब जिंकल्यानंतर रोहित शर्माला जसं समजलं की, एमएस धोनीने टीम इंडियाच्या यशाच कौतुक केलय. त्यानंतर त्याने आभार मानायला जराही विलंब लावला नाही. रोहित शर्मा ANI शी बोलताना धोनीने जे कौतुक केलं, त्यावर व्यक्त झालाच. त्याशिवाय अजूनही काही बोलला.

Rohit Sharma : धोनीने जे म्हटलं, त्याने रोहित शर्माला भरुन आलं, प्रतिक्रिया देताना म्हणाला....
Rohit Sharma Image Credit source: AFP
| Updated on: Jun 30, 2024 | 9:47 AM
Share

भारताचा अव्वल क्रिकेटपटू एम.एस.धोनी तसं सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतो. पण टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप 2024 च्या जेतेपदाने धोनीला या प्लॅटफॉर्मवर यायला भाग पाडलं. काल बारबाडोस येथे फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षानंतर T20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाने सगळ्यांनाच प्रचंड आनंद झालाय. याला भारताचे माजी क्रिकेटपटू सुद्धा अपवाद नाहीयत. टीम इंडियाला पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवून देणाऱ्या एमएस धोनीने खास पोस्ट केलीय. बारबाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप उंचावणाऱ्या रोहित शर्माल जसं कळलं की, धोनीने टीम इंडियासाठी खास पोस्ट केलीय, त्याने लगेच आभार मानले.

ANI शी बोलताना रोहित शर्माने धोनीने जे कौतुक केलं, त्यावर प्रतिक्रिया दिली. धोनीनंतर टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा रोहित शर्मा दुसरा कॅप्टन आहे. रोहित शर्माने सर्वप्रथम धोनीची प्रशंसा केली. “तो कमीलाचा खेळाडू आहे. त्याने देशासाठी खूप काही केलय. अशावेळी धोनीकडून जर कौतुकाचे शब्द आले असतील, तर ती मोठी गोष्ट आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.

धोनीच्या कौतुकाशिवाय रोहित शर्मा अजून काय बोलला?

धोनीने इनस्टाग्राम पोस्टमध्ये टीम इंडियासाठी काय म्हटलय, ते आधी जाणून घ्या. धोनीने आधी सर्व टीमला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकण माझ्यासाठी गिफ्टसारख आहे असं धोनीने म्हटलय. रोहित शर्मा ANI शी बोलताना धोनीने जे कौतुक केलं, त्यावर व्यक्त झालाच. पण त्याशिवाय टीम इंडियाचा विजय आणि आपला प्रवास या बद्दल सुद्धा बोलला. “2007 मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचवर्षी T20 वर्ल्ड कप जिंकला आणि आता हा वर्ल्ड कप. मी भरपूर खुश आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.