
1587851,1587745,1587710,1587668 Rohit Sharma Security Breach: न्यूझीलंडविरोधातील एकदिवशीय मालिकेत रोहित शर्मा चमकला नाही. या तीन सामन्यात तो अर्धशतकी खेळी करू शकला नाही. इंदूर वनडेनंतर हॉटेलमध्ये जाताना एक मोठी घटना घडली. एक महिला धावतच आली आणि तिने रोहितचा हात धरला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma Video: न्यूझीलंडविरोधात वनडे सीरीजदरम्यान रोहित शर्मा याच्या ध्यानीमनी नसताना एक मोठी घटना घडली. इंदूरमधील तिसऱ्या वनडेनंतर रोहित शर्मा हा हॉटेलमध्ये जात असताना एका अनोळखी महिलेने त्याचा हात धरला. रोहित शर्मा हा हॉटेलमध्ये एंट्री करत होता. तेव्हा अचानक धावत ही महिला आली. ती सुरक्षा कडं तोडून रोहित शर्माजवळ पोहचली. तिने रोहित शर्माचा हात धरला. अचानक एक अनोळखी महिला धावत आल्याने हिटमॅनला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या महिलेला रोहितपासून दूर केले.
मदतीसाठी महिलेचे कृत्य
रोहित शर्मा याचा हात पकडण्यापूर्वी ही महिला हेल्प हेल्प अशी ओरडताना दिसली. वृत्तानुसार, या महिलेची मुलगी एका गंभीर आजाराने पीडित आहे. तिच्या दाव्यानुसार, या मुलीला वाचवण्यासाठी 9 कोटी रुपयांचे इंजेक्शन गरजेचे आहे. त्यामुळे मदत मिळावी यासाठी ती मैदानाजवळ आणि नंतर हॉटेलजवळ रोहित शर्माची वाट पाहत होती. रोहित शर्मा याने तिला मदत केली की नाही हे अद्याप समोर आलं नाही.
रोहितची निराशजनक कामगिरी
न्यूझीलंडविरोधातील वनडे सीरीजमध्ये इंदूरमध्ये रोहितला खास कमाल दाखवता आली नाही. अवघ्या अकरा धावा करुन रोहित तंबूत परतला. राजकोट आणि बडोदा येथील वनडेमध्ये सुद्धा त्याला मोठी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडविरोधात रोहितला अखेरपर्यंत सूर गवसला नाही. तो केवळ 61 धावा करू शकला. एकदिवशीय मालिकेत निराशाजनक कामगिरीनंतर त्याची वनडे रँकिंग फारच घसरली. तो या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर घसरला. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीच्या सुरुवातीला रोहित या क्रमवारीत अव्वल स्थानी होता.
A woman suddenly dodged the security and ran towards Rohit Sharma, grabbed his hand, and started shouting “help, help” at team hotel in Indore during indvnz match two days ago.
A few days ago, a similar woman had also gone to Elvish Yadav with her child. She was asking for help,… pic.twitter.com/AUXkqaC8jp
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) January 20, 2026
रोहित शर्माचा मोठा ब्रेक
रोहित शर्मा आता पाच महिन्यांपर्यंत टीम इंडियासाठी खेळणार नाही. आता टीम इंडिया जुलै महिन्यात इंग्लंडविरोदात वनडे सीरीज खेळेल. रोहित शर्मा याने कसोटी आणि टी20 फॉर्म्यटमध्ये अगोदर निवृत्ती घेतली आहे. रोहित आता IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळेल. तोपर्यंत तो मोठ्या सामन्यांपासून दूर असेल. त्यानंतर तो पुन्हा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल.