AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir हाय हाय…खरंच इंदूर स्टेडियमवर नारेबाजी? विराट कोहलीच्या व्हायरल रिॲक्शनची इनसाईड स्टोरी

Gautam Gambhir India Vs New Zealand Match: इंदूरमध्ये न्युझीलँडसोबत भारताने एकदिवशीय मालिका गमावली. त्यानंतर भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर हाय हाय चे नारे देण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. काय आहे त्यामागील सत्य? विराट कोहलीच्या रिॲक्शनवरुन हे सत्य समोर आले आहे.

Gautam Gambhir हाय हाय...खरंच इंदूर स्टेडियमवर नारेबाजी? विराट कोहलीच्या व्हायरल रिॲक्शनची इनसाईड स्टोरी
गौतम गंभीर, विराट कोहलीImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 20, 2026 | 2:50 PM
Share

Gautam Gambhir Viral Video Kohli Reaction: इंदूरमध्ये फलंदाजी ढासळल्याने भारताला तिसरा आणि अखेरचा एकदिवशीय सामना गमवावा लागला. टीम इंडियाच्या पराभावानंतर या स्टेडियममध्ये भारतीय कोच गौतम गंभीर यांच्या नावाने हाय हायचे नारे देण्यात आले, असा दावा केल्या जात आहे. याविषयीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. ही मालिका गमावल्याने क्रिकेट चाहते संतापले आहेत. त्यातूनच हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. पण विराट कोहलीच्या रिॲक्शनवरुन याविषयीचे सत्य समोर आले आहे. वनडे सीरिजमध्ये न्युझीलँडने 2-1 अशी मालिका खिशात घातली.

व्हिडिओ नाही खरा, काय सत्य?

कीवी संघाने भारतात एकदिवशीय मालिका जिंकली. टीम इंडियाचा सलग विजयाची परंपरा खंडित केले. भारताच्या या ऐतिहासिक पराभवानंतर कोच गौतम गंभीरविषयीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे. यामध्ये इंदूर स्टेडियमवर चाहते गौतम गंभीर हाय हाय, अशी नारेबाजी करत असल्याचे समोर येत आहे. पण हा व्हिडिओ खरा नसल्याचे उघड झाले आहे. तर हा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

‘Gautam Gambhir हाय-हाय’ व्हिडिओचे सत्य काय?

या व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली, कोच गौतम गंभीर, श्रेयस अय्यर, हर्षित राणा आणि केएल राहुलसह इंदूर स्टेडियममध्ये जाताना दिसत आहेत. त्याचवेळी गंभीर हाय हाय असे नारेबाजी ऐकू येते. या व्हिडिओ चाहत्यांच्या स्टँड्सकडून हा आवाज असल्याचे दिसते. त्याकडे सर्वच खेळाडूंचे लक्ष जाते. ही नारेबाजी ऐकून स्टार फलंदाज विराट कोहलीला पण चांगले वाटत नाही. त्यावेळी कोहली हा त्याच्या सहकाऱ्याशी बोलत त्या चाहत्यांकडे पाहताना आणि काही इशारा करताना या व्हिडिओत दिसतो.

व्हिडिओ एडिट केलेला

हा व्हिडिओ जुना असल्याचे समोर येत आहे. विराट कोहलीच्या त्या प्रतिक्रियेवरून हा व्हिडिओ जुना असून त्यात ऑडियो मिक्स केल्याचे समजते. या व्हिडिओत गंभीर हाय हाय असा ऑडिओ नंतर जोडल्याचे समोर येत आहे. हा ऑडिओ दुसऱ्या कोणत्या तरी व्हिडिओतून उचलून या व्हिडिओला जोडण्यात आला आहे आणि तो सामना गमावल्यानंतर विविध समाज माध्यमांवर शेअर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत गुवाहाटी येथे झालेल्या कसोटी सामन्यात चाहत्यांनी गंभीरविरोधात नारेबाजी केली होती. आता या व्हिडिओत हा ऑडिओ जोडण्यात आला आहे. इंदूरच्या स्टेडियमवर असा प्रकार घडल्याची पुष्टी अद्याप कोणत्याच माध्यमांनी केलेली नाही. त्यामुळे गौतम गंभीरला प्रेक्षकांनी त्रास दिल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!