Rohit Sharma Statement : ‘तेव्हा बाहेरच्या लोकांना तुम्ही….’ संतापलेल्या रोहितने रवी शास्त्रींना थेट दिलं उत्तर
Rohit Sharma Statement : रवी शास्त्री असं काय बोलले, ज्याचा रोहित शर्माला इतका राग आला?. वर्ष 2014 पासून 6 वर्ष रवी शास्त्री टीम इंडियाचे हेड कोच होते. मागच्या दीड वर्षापासून रोहित शर्मा टीम इंडियाच नेतृत्व करतोय.

Rohit Sharma Press Conference : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने माजी हेड कोच रवी शास्त्री यांच्या टिप्पणीला थेट बकवास म्हटलय. भारतीय टीमला इंदोरमध्ये अतिआत्मविश्वास नडला, असं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं होतं. वर्ष 2014 पासून 6 वर्ष रवी शास्त्री टीम इंडियाचे हेड कोच होते. तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कॉमेंट्री करताना रवी शास्त्री म्हणाले की, “टीम इंडियाला इंदोर कसोटी अतिआत्मविश्वास नडला. असच घडणार, असं ते ठरवून चालले होते”. इंदोर टेस्ट मॅचमध्ये फिरकीला अनुकूल असलेल्या विकेटवर टीम इंडियाचा 9 विकेटने पराभव झाला.
रोहित शर्माने काय उत्तर दिलं?
मागच्या दीड वर्षापासून रोहित शर्मा टीम इंडियाच नेतृत्व करतोय. शांत, संयमी कर्णधार अशी रोहितने स्वत:ची एक प्रतिमा बनवली आहे. त्याला तिसऱ्या कसोटीविषयी रवी शास्त्री यांनी व्यक्त केलेल्या मताविषयी विचारलं, तेव्हा रोहितने ठामपणे उत्तर दिलं. “प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, जेव्हा तुम्ही दोन मॅच जिंकता, तेव्हा बाहेरच्या लोकांना तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहात, असं वाटतं. हे पूर्णपणे बकवास आहे. कारण तुम्हाला सर्वच्या सर्व चार सामन्यांमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करायचं असतं”
ओव्हर कॉन्फिडन्सबद्दल तुम्ही बोलता, पण….
“तुम्हाला दोन मॅच जिंकून थांबायच नसतं, हे सरळ आहे. ड्रेसिंग रुमचा भाग नसलेले लोक ओव्हर कॉन्फिडन्स बद्दल बोलतात, तेव्हा त्यांना ड्रेसिंग रुममध्ये काय चर्चा झाली? ते माहित नसतं” असं रोहित शर्मा म्हणाला. वर्षभरापूर्वी टीमची रणनिती आखण्यात जी व्यक्ती सहभागी होती, त्यांच्याबद्दल रोहितच हे विधान आहे. आम्ही महत्त्व देत नाही
“आम्हाला सर्वच सामन्यांमध्ये सर्वोत्त प्रदर्शन करायच असतं. कुठल्या बाहेरच्या व्यक्तीला हा अतिआत्मविश्वास वाटत असेल, तर त्याला आम्ही महत्त्व देत नाही” असं रोहित शर्मा म्हणाला. “रवी स्वत: ड्रेसिंग रुमचा भाग होता. आम्ही खेळतो, तेव्हा आमची मानसिकता काय असते, हे त्याला माहित आहे. हा अति आत्मविश्वास नाही” असं रोहित शर्मा म्हणाला.
