AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच रोहित शर्माने गौतम गंभीरबाबत काय ते सांगून टाकलं, म्हणाला…

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर आली. पण टीम इंडियाची कसोटीतील कामगिरी पाहता टीकेची झोड उठली होती. पण त्याच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. जेतेपदानंतर रोहित शर्माने गौतम गंभीरबाबत आपलं मत मांडलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच रोहित शर्माने गौतम गंभीरबाबत काय ते सांगून टाकलं, म्हणाला...
रोहित शर्मा आणि गौतम गंभीरImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 09, 2025 | 10:53 PM
Share

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. 12 वर्षानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. खरं तर आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीनंतर गौतम गंभीरचं कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसात त्याच्या प्रशिक्षकपदावर टीका होत होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर टीकारांनी हद्द ओलांडली होती. पण गौतम गंभीरने शांतपणे टीम इंडियाच्या बांधणीत हातभार लावला. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत स्पर्धा जिंकण्याचं मोठं आव्हान होतं. पण भारताने त्याची उणीव भासू दिली नाही. अंतिम सामन्यापर्यंत भारताने पाच सामने जिंकले. भारताने साखळी फेरीत 3 सामने , उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वात पुन्हा एकदा टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. तसेच आतापर्यंत केलेल्या टीकांना विजयाने उत्तर दिलं आहे. विजयानंतर रोहित शर्माने मन मोकळं केलं.

‘आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही आमच्या पद्धतीने निकाल मिळणे ही एक उत्तम भावना आहे, आम्ही हा सामना कसा खेळलो याबद्दल खूप आनंदी आहे. हे माझ्यासाठी स्वाभाविक नाही पण ते असे काहीतरी आहे जे मला खरोखर करायचे होते. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला संघाचा पाठिंबा हवा असतो आणि ते माझ्यासोबत होते २०२३ च्या विश्वचषकात राहुल द्रविडने पाठिंबा दिला आणि आता गौतम गंभीर खंबीरपणे उभा राहिला.’ असं रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दित भारताने पहिलं जेतेपद मिळवलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकात 7 गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भाराताने 49 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने हा सामना 4 विकेट आणि 6 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 76 धावा केल्या.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले