Rohit Sharma : रोहित शर्माने ठरवलं, IPL 2025 मध्ये ‘या’ टिमकडून खेळणार हिटमॅन

Rohit Sharma : रोहित शर्मा IPL 2025 मध्ये कुठल्या टीमकडून खेळणार? हा प्रश्न आहे. मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनशिपवरुन बरीच चर्चा झाली. हार्दिक पांड्यासोबत जमत नसल्याच्या बातम्या आल्या. रोहित शर्मा मुंबईची साथ सोडून दुसऱ्या टीमकडून खेळणार असं सुद्धा बोललं गेलं.

Rohit Sharma : रोहित शर्माने ठरवलं, IPL 2025 मध्ये 'या' टिमकडून खेळणार हिटमॅन
Rohit Sharma
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 1:33 PM

IPL 2025 च्या मेगा ऑक्शनआधी एका खेळाडूची सर्वाधिक चर्चा आहे. हा खेळाडू अजून कोणी नसून, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आहे. यामागे कारण आहे, मागच्या सीजनमध्ये झालेला कॅप्टनशिपचा वाद. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं. त्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबतच राहणार की, आणखी कुठल्या फ्रेंचायजीकडून खेळणार हे जाणून घेण्यास फॅन्स इच्छुक आहेत. रोहित मुंबईची साथ सोडून दुसऱ्या टीमकडून खेळू शकतो, मागच्या अनेक महिन्यांपासून अशा बातम्या येत आहेत. आता एक नवीन माहिती समोर आलीय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्रेंचायजीसोबत असलेला सर्व वाद आता मिटला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिटेन करण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. रोहितने सुद्धा ठरवलय की, तो मुंबई टीमकडूनच खेळणार. अजूनपर्यंत फक्त अधिकृतपण समोर आलेल नाहीय. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 आधी गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेड करुन मुंबईच कॅप्टन बनवलं. त्यासाठी फ्रेंचायजीला मोठी रक्कम मोजावी लागलेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईने त्यासाठी ट्रान्सफर फी म्हणून 100 कोटी रुपये दिले होते. या रक्कमेवर कोणीही अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाहीय.

मुंबई इंडियन्सने काय म्हटलय?

त्यानंतर फ्रेंचायजीने अचानक पांड्याला टीमच कॅप्टन बनवल्याची घोषणा केली. फॅन्स त्यामुळे दुखावले गेले. ताज्या रिपोर्ट्नुसार फ्रेंचायजीने सर्व वाद मिटवले आहेत. रोहित शर्मा कुटुंबाचा महत्त्वाचा सदस्य असून त्यांना रिटेन करण्यासाठी तयार आहोत असं मुंबई इंडियन्सने म्हटलय.

रोहित कॅप्टन बनताच काय फरक दिसला?

रोहित शर्मा 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनला. कॅप्टन बनताच त्याने मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम आयपीएल चॅम्पियन बनली. त्यानंतर पुढची तीन वर्ष आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं.

कॅप्टन बनवणार का?

2022 मध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन बनला. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने WTC आणि वनडे वर्ल्ड कपची फायनल गाठली. T20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. मुंबईची टीम रोहितला रिटेन करणार असली, तरी कॅप्टन बनवणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.