AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : ‘हरला, तर रोहीत शर्मा बारबाडोसच्या समुद्रात उडी मारेल’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचे शब्द

Rohit Sharma : सात महिन्यात टीम इंडिया दुसऱ्यांदा वर्ल्ड कपची फायनल खेळतेय. याआधी नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियान टीम इंडियावर विजय मिळवला होता. आता काही महिन्यात टीम इंडियाकडे पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी चालून आलीय. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया फायनलमध्ये उतरणार आहे.

Rohit Sharma : 'हरला, तर रोहीत शर्मा बारबाडोसच्या समुद्रात उडी मारेल', भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचे शब्द
aiden markram and rohit sharma sa vs ind
| Updated on: Jun 29, 2024 | 1:06 PM
Share

टीम इंडियाचा आज 11 वर्षापासूनचा ICC ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत जबरदस्त प्रदर्शन केलय. सेमीफायनलमध्ये इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही टीम्स एकही सामना न गमावता फायनलमध्ये पोहोचल्या आहेत. दोन्ही टीम्सच्या वर्ल्ड कपमधील प्रदर्शनावर नजर टाकली, तर दक्षिण आफ्रिकेने काही सामन्यात निसटत्या फरकाने विजय मिळवलाय. तेच टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धचा अपवाद वगळता सर्व सामने आरामात जिंकले आहेत. पाकिस्तान विरुद्ध मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत अक्षरक्ष: विजय खेचून आणला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीनवेळा आयसीसी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. वनडे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही ठिकाणी ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. आता बारबाडोसमध्ये रोहित शर्माकडे कदाचित आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची शेवटची संधी असेल. रोहित आयसीसी ट्रॉफी विजयाची प्रतिक्षा संपवायला आतुर असेल असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलय.

‘नशिबाची साथ सुद्धा गरजेची’

“सहा-सात महिन्यात रोहित दोन वर्ल्ड कपच्या फायनल गमावेल असं वाटत नाही. सात महिन्यात त्याच्या नेतृत्वाखाली दोन फायनल गमावल्या, तर रोहित बारबाडोसच्या समुद्रात उडी मारेल” असं सौरव गांगुलीने म्हटलय. “त्याने आघाडीवर राहून नेतृत्व केलय. उत्तम फलंदाजी केलीय. उद्या सुद्धा हे कायम राहील अशी अपेक्षा आहे. मोकळेपणाने खेळताना भारत योग्य पद्धतीने समापन करेल अशी अपेक्षा आहे. टुर्नामेंटमधील ही एक उत्तम टीम आहे. माझ्याकडून त्यांना विजयासाठी शुभेच्छा. नशिबाची साथही त्यांना असेल अशी अपेक्षा. मोठ्या टुर्नामेंट जिंकण्यासाठी नशिबाची साथ सुद्धा गरजेची असते” असं सौरव गांगुली म्हणाला.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.