RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru, 1st Innings Highlights : राजस्थान रॉयल्सला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सलग आणि एकूण चौथा सामना जिंकण्यासाठी 202 धावा कराव्या लागणार आहेत.

RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Dhruv Jurel and Rajat Patidar RR vs RCB
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 10, 2026 | 11:04 PM

कॅप्टन रजत पाटीदार याने केलेलं चाबूक अर्धशतक आणि अखेरच्या क्षणी वेंकटेश अय्यर याच्या इम्पॅक्ट खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात 200 पार मजल मारता आली. आरसीबीने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्ससमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने राजस्थान रॉयल्स विरूद्ध 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 रन्स केल्या आहेत. राजस्थान आणि बंगळुरु दोन्ही संघांनी या मोसमात खेळलेले आपले सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता कोणत्या संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

आरसीबीची अखेरच्या 17 चेंडूत निर्णायक फटकेबाजी

राजस्थानने आरसीबीला 18 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 166 रन्सवर आठवा झटका दिला. त्यामुळे आरसीबी 200 पार पोहचेल असा कुणी विचारही केला नसेल. मात्र त्यानंतरही आरसीबीने जोरदार कमबॅक केलं. आरसीबीला 200 पार पोहचवण्यात वेंकटेश आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनी अखेरच्या टप्प्यात प्रमुख भूमिका बजावली. तसेच वेंकटेश याने भुवनेश्वर कुमार याच्यासह नवव्या विकेटसाठी 17 बॉलमध्ये नॉट आऊट 35 रन्सची पार्टनरशीप केली.

वेंकेटेशची इम्पॅक्ट खेळी

वेंकेटेशने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 29 रन्स केल्या. भुवनेश्वर कुमार याने 7 चेंडूत 1 चौकारासह निर्णायक आणि नाबाद 9 धावा जोडल्या. त्याआधी रोमरियो शेफर्ड याने 200 च्या स्ट्राईक रेटने 11 बॉलमध्ये 22 रन्स ठोकल्या. रोमरियोने या दरम्यान 1 सिक्स आणि 2 फोर लगावले. ब्रिजेश शर्मा याने टीम डेव्हीड याला 13 धावांवर आऊट केलं. कृणाल पंड्या आणि जितेश शर्मा या दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

लाईव्ह स्कोअर

रजत पाटीदारचा झंझावात

कॅप्टन रजतने कॅप्टन्सी इनिंग साकारली. रजतने 4 सिक्स आणि 4 फोरसह 40 बॉलमध्ये 63 रन्स केल्या. देवदत्त पडीक्कल 14 धावांवर बाद झाला. विराटने 16 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. तर फिल सॉल्ट याला भोपळा फोडता आला नाही. मात्र आरसीबीने अनेक अडचणींनंतरही 200 पेक्षा अधिक धावा करुन दाखवल्या. राजस्थानसाठी तिघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. रवी बिश्नोई, जोफ्रा आर्चर आणि ब्रिजेश शर्मा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज संदीप शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. आता राजस्थानचे फलंदाज 202 धावा पूर्ण करुन सलग चौथा विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार की आरसीबी तिसरा सामना जिंकणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us