AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB IPL 2022 Match Preview: दोन रॉयल्स भिडणार, फायनलचा दुसरा संघ उद्या ठरणार

क्वालिफायर 2 मध्ये तुम्ही दबाव कशा पद्धतीने हाताळता ते खूप महत्त्वाचं आहे. जो संघ चांगला खेळेल, तो विजय मिळवेल. दोन्ही संघ आयपीएलमध्ये परस्पराविरोधात 24 सामने खेळलेत.

RR vs RCB IPL 2022 Match Preview: दोन रॉयल्स भिडणार, फायनलचा दुसरा संघ उद्या ठरणार
बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत तिसऱ्यांदा होत आहे.Image Credit source: social
| Updated on: May 26, 2022 | 8:06 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या क्वालिफायर 2 मध्ये उद्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RR vs RCB) सामना होणार आहे. उद्या जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर हरणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. राजस्थानचा संघ क्वालिफायरचा पहिला सामना हरला आहे, तर RCB ने लखनौवर विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. आता पुढचे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांनी कामगिरी कशी केली, ते आता महत्त्वाचं नाही. आता प्लेऑफची स्टेज आहे. नशिबामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, पण एलिमिनेटरमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने लखनौला हरवलं, ते पाहता राजस्थानसाठी हा सामना सोपा नाहीय. क्वालिफायर वन मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थानला पराभूत केलं होतं. या जय-पराजयामुळे वाढलेल्या आणि खचलेल्या मनोबलाचा परिणाम सामन्यामध्ये दिसू शकतो.

आकडे काय सांगतात?

क्वालिफायर 2 मध्ये तुम्ही दबाव कशा पद्धतीने हाताळता ते खूप महत्त्वाचं आहे. जो संघ चांगला खेळेल, तो विजय मिळवेल. दोन्ही संघ आयपीएलमध्ये परस्पराविरोधात 24 सामने खेळलेत. यात 13 RCB ने तर 11 राजस्थान रॉयल्सने जिंकलेत. हेच आकडे पाहून, मोहम्मद अझरुद्दीनने उद्या एक दमदार सामना पहायला मिळेल, असं म्हटलं आहे.

प्रत्येक सामना नवीन असतो

IPL 2022 च्या ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झालेत. दोन्ही टीम्सनी प्रत्येकी एक मॅच जिंकली आहे. मागचे पाच सामने पाहता, राजस्थान रॉयल्सची बाजू थोडी कमकुवत वाटतेय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये याआधी दोन्ही टीम्समध्ये एक मॅच झालीय. तो सामना RCB ने जिंकला होता. आकडे आरसीबीच्या बाजूने असले, तरी प्रत्येक सामना नवीन आहे. जो संघ सर्वोत्तम खेळेल, तोच फायनलमध्ये पोहोचेल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.