AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs NED Live Streaming | दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने, सामना कधी कुठे पाहता येईल?

South Africa vs Netherlands Live Streaming | नेदरलँड्स क्रिकेट टीम ही दक्षिण आफ्रिका टीमच्या तुलनेत कमजोर आहे. मात्र याच नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा बाजार उठवला होता.

SA vs NED Live Streaming | दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने, सामना कधी कुठे पाहता येईल?
| Updated on: Oct 16, 2023 | 11:33 PM
Share

धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 15 सामना मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने असणार आहेत. अफगाणिस्तानने रविवारी 15 ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करत मोठा उलटफेर केला. त्यानंतर आता नेदरलँड्सही दक्षिण आफ्रिका विरुद्ध पुन्हा इतिहास रचण्यासाठी तयार आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका टीमला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 मधून बाहेर केलं होतं. त्यामुळे नेदरलँड्स पुन्हा तशी कामगिरी करणार का, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे. आपण या सामन्याबाबत थोडक्यात पण महत्त्वाचं जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्याचं आयोजन कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स हा सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना किती वाजता सुरु होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर फुकटात पाहायला मिळेल. त्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल.

दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .

नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.