Sara Tendulkar : इंडिया-पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेवरुन सचिनला लेकीचं नाव सुचलं, तुम्हाला माहितीय?

Sara Tendulkar Name Interesting Story : सोशल मीडियावर एक्टीव्ह असणारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर. साराच्या नावामागचं इंडिया-पाकिस्तान स्पर्धेचं कनेक्शन माहितीय का?

Sara Tendulkar : इंडिया-पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेवरुन सचिनला लेकीचं नाव सुचलं, तुम्हाला माहितीय?
sara tendulkar
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 4:56 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेवरुन सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेचाखेची सुरु आहे. या स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे भारताचा टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी आधीपासूनच विरोध होता आणि आताही आहे. तर पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार नसल्याचं म्हटलं जातंय. दोन्ही देशांच्या या भूमिकेमुळे आयसीसीची कोंडी झाली आहे. अशात आयसीसी या स्पर्धेचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. आता पाकिस्तान बॅकफूटवर जाऊन हायब्रिड मॉडेलसाठी तयार होते की आयसीसी थेट दक्षिण आफ्रिकेत स्पर्धेचं आयोजन करते? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेट सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हीचं भारत-पाकिस्तान यांच्यातील एका स्पर्धेसह खास कनेकन्शन आहे. कट्टर क्रिकेट चाहत्यांना सचिनने तिच्या लेकीचं नाव कसं ठेवलेलं? त्याला हे सारा नाव कसं सुचलं? हे माहित असेल. मात्र ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी आपण सचिनला नक्की हे नाव कसं सुचलं? भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणत्या स्पर्धेमुळे सारा हे नाव मिळालं? हे आपण जाणून घेऊयात.

स्पर्धेवरुन मिळालं नाव

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या कट्टर आणि चीर प्रतिद्वंदी संघांमध्ये 1997 साली सहारा कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सचिनने त्या स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं होतं. त्या स्पर्धेत एकूण 5 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने सहारा कप स्पर्धेत पाकिस्तानवर 4-1 ने विजय मिळवला होता. आता याचा आणि साराचा काय संबंध? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलंय.

भारताने सचिनच्या नेतृत्वात सप्टेंबर 1997 साली पाकिस्तानला लोळवून सहारा कप स्पर्धेवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर महिन्याभरातच सचिनला कन्या रत्नाचा लाभ झाला. त्यामुळे आता मुलीचं नाव काय ठेवायचं? हा प्रश्न इतर वडिलांप्रमाणे सचिनसमोरही होताच. त्यावरही सचिनने मात केली. आपल्या नेतृत्वात सहारा कप जिंकलाय. सचिन यातून प्रेरित झाला. त्यामुळे सचिनने सहारा कप यावरुन सारा हे नाव निश्चित केलं.

दरम्यान आता दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. दोन्ही देशातील संबंधामुळे क्रिकेट संघ एकमेकांसह आशिया आणि आयसीसी स्पर्धेचा अपवाद वगळता खेळत नाहीत.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.