‘असं वाटतं माझा स्वतःचा एक भाग जग सोडून गेलाय’, सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट

भारतातील दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे (Vasoo Paranjape) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी सोमवारी (30 ऑगस्ट) निधन झालं. त्यांनी सुनिल गावस्करांपासून सचिन तेंडुलकर ते आता रोहित शर्मापर्यंत अनेक हिऱ्यांना प्रशिक्षण दिलं. यानंतर सचिन तेंडुलकरने वासु परांजपे यांना आदरांजली देत आपली भावना व्यक्त केली.

'असं वाटतं माझा स्वतःचा एक भाग जग सोडून गेलाय', सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 7:08 AM

मुंबई : भारतातील दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे (Vasu Paranjape) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी सोमवारी (30 ऑगस्ट) निधन झालं. त्यांनी सुनिल गावस्करांपासून सचिन तेंडुलकर ते आता रोहित शर्मापर्यंत अनेक हिऱ्यांना प्रशिक्षण दिलं. यानंतर सचिन तेंडुलकरने वासु परांजपे यांना आदरांजली देत आपली भावना व्यक्त केली. वासू सरांच्या जाण्यानं माझ्या स्वतःचा एक भाग हे जग सोडून गेलाय असं वाटत असल्याची भावन सचिनने व्यक्त केली. सचिननं ट्विट करत त्यांच्याविषयी आपल्या अनेक आठवणींनाही उजाळा दिला.

सचिन तेंडुलकर म्हणाला, “वासु सर हे मी आत्तापर्यंत काम केलेल्या प्रशिक्षकांपैकी सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक होते. ते माझ्या लहानपणापासूनच्या क्रिकेटच्या प्रवासाचे अविभाज्य भाग होते. ते अनेक प्रकारे माझे मार्गदर्शक होते. माझ्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात ते मला म्हणायचे, ‘तु पहिले 15 मिनिटे व्यवस्थित पाहिलेस, तर विरोधक तुला दिवसभर पाहत राहतील.’ ते ज्ञानी होते आणि त्यांच्यात खूप चांगली विनोदबुद्धीही होती. मी काही दिवसांपूर्वीच त्यांना भेटलो, तर ते पहिल्यासारखेच विनोद करत होते.”

… आणि वासू सरांनी केअरटेकरलाही क्षेत्ररक्षण करण्यास सांगितलं

“इंदोरमधील अंडर 15 नॅशनल कॅम्पमध्ये एकदा केअरटेकर त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले. मुलं रात्रीची टेनिस बॉलवर खेळत आहेत. यासाठी आपल्याला काही मदतीची गरज आहे, असं केअरटेकर वासू सरांना म्हणाले. यावर ‘ते मुलं आहेत आणि खेळणारच. तुम्हीही का त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण करत नाही’, असं म्हणत वासू सरांनी तात्काळ आपल्या खास स्टाईलमध्ये केअरटेकरलाच क्लिनबोल्ड केलं,” असं सचिननं सांगितलं.

“वासू सर चेहऱ्यावर हसू उमटेल अशा त्यांच्या अनेक आठवणी मागे ठेऊन गेले आहेत. त्यांच्या जाण्यानं मला माझाच एक भाग हे जग सोडून गेलाय असं वाटतं,” अशीही भावना सचिननं व्यक्त केली.

वासू परांजपे कोण होते?

वासु परांजपे यांचा जन्म 21 नोव्हेंबर, 1938 रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1956 ते 1970 दरम्यान मुंबई आणि वडोदरा संघासाठी 29 प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या वासु यांनी 23.78 च्या सरासरीने 785 धावा केल्या होत्या. तर नऊ विकेटही मिळवल्या होत्या. त्यांच्या काळात ते मुंबईत दादर यूनियन संघासाठी खेळत. त्यावेळी त्यांचा संघ सर्वात ताकदवर संघ मानला जात. त्यांचा मुलगा जतिन परांजपे हा देखील भारतासाठी खेळला असून नॅशनल सिलेक्टरही राहिला आहे.

वासु यांनी भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य घडवलं. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा सारखी नावांचा यात समावेश आहे. अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून वासू यांनी काम पाहिलं असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर रवी शास्त्री, विनोद कांबळी, अनिल कुंबळे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करत ट्विट केलं.

गावस्करांना टोपणनाव दिलं, तर संदीप पाटीलचं घर बसवलं

सुनील गावस्कर यांना सर्वजण सनी या निकनेमने बोलावतात. हे नाव वासु परांजपे यांनीच दिलं होतं. वासु परांजपे क्रिकेटसोबत बाकी गोष्टीतही हुशार होते. त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना खासगी जीवनातही मदत केली आहे. संदीप पाटील यांच्या विवाहावेळी मुलीकडचे मान्य होत नव्हते. त्यावेळी वासु यांनी मध्यस्थी करुन हे लग्न घडवून आणलं होतं.

हेही वाचा :

सुनिल गावस्कर ते सचिन तेंडुलकर पर्यंत अनेकांना घडवणारे वासु परांजपे कालवश, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Tokyo Paralympics भारतासाठी आजचा दिवस सुवर्णमय, दोन सुवर्णपदकांसह पाच पदकं खिशात, वाचा कोणी कोणतं पदक जिंकलं

VIDEO : Tokyo Paralympics मध्ये भारताला सुवर्णपदक, सुमितने फोडली डरकाळी, हाच तो विक्रमी थ्रो

व्हिडीओ पाहा :

Sachin Tendulkar on death of cricketer trainer Vasoo Paranjape

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.