AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw : वाईट काळात पृथ्वी शॉ याच्या पाठिशी उभा राहिला तेंडुलकर, ‘या’ शब्दातून वाढवली हिम्मत

Prithvi Shaw controversy : या वादाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. ज्यात पृथ्वी एका महिलेला मारहाणीपासून रोखताना दिसतोय. पृथ्वीचा आधीच टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष सुरु असताना, तो एका नव्या वादात अडकलाय.

Prithvi Shaw : वाईट काळात पृथ्वी शॉ याच्या पाठिशी उभा राहिला तेंडुलकर, 'या' शब्दातून वाढवली हिम्मत
Prithvi shaw-Sapna gill
| Updated on: Feb 20, 2023 | 7:48 AM
Share

Prithvi Shaw controversy : टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या वादात सापडला आहे. मुंबईत एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ वर हल्ल्याचा प्रयत्न झाला. एक महिला आणि तिच्या सोबत असलेल्या काही जणांनी पृथ्वी व त्याच्या मित्रांवर हल्ला केला. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. या वादाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. ज्यात पृथ्वी एका महिलेला मारहाणीपासून रोखताना दिसतोय. पृथ्वीचा आधीच टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष सुरु असताना, तो एका नव्या वादात अडकलाय.

पृथ्वीसाठी हे संघर्षाचे दिवस आहेत. सोशल मीडियावर काही जणांनी पृथ्वीच समर्थन केलय. पण क्रिकेट विश्वातून आतापर्यंत कोणीही उघडपणे पृथ्वीच्या समर्थनासाठी पुढे आलं नव्हतं. या कठीण काळात आता पृथ्वीला एका खास व्यक्तीने समर्थन दिलय.

तेंडुलकरने मेसेजमध्ये काय म्हटलय?

मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने साथ दिलीय. अर्जुनने या कठीण काळात मित्रासाठी सपोर्टचा मेसेज पोस्ट केलाय. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. यात “हिम्मत सोडू नकोस, मजबूत रहा. चांगल्या आणि वाईट काळात नेहमी तुझ्यासोबत आहे” असं अर्जुनने त्याच्या मेसेजमध्ये म्हटलय. अर्जुनने पृथ्वीसोबतचा बालपणीचा एक फोटोही पोस्ट केलाय.

बेसबॉलच्या बॅटने मारहाणीचा प्रयत्न

बुधवारी 15 फेब्रुवारीला मुंबईत एका पबमध्ये पृथ्वीसोबत फोटो काढण्यावरुन वाद झाला. भारतीय क्रिकेटर आणि त्याच्या मित्रांच इंफ्लुएंसर सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत भांडण झालं. मारहाणीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पबच्या बाहेर पृथ्वी स्वत:ला वाचवण्यासाठी आरोपी मुलीच्या हातून बेसबॉलची बॅट काढून घेताना दिसला. सपना गिल अटकेत

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केलीय. 8 लोकांनी मिळून गाडीवर हल्ला केला व मारहाणीचा प्रयत्न केला असा आरोप आहे. पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. इंफ्लुएंसर सपना गिलला पोलिसांनी अटक केलीय.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.