AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वात तिसऱ्यांदा भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहचून पराभूत झाला. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली
Sachin Tendulkar
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 4:31 PM
Share

मुंबई : इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये पार पडलेल्या कसोटी क्रिकेटच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. संपूर्ण स्पर्धेत अनेक अप्रतिम विजय मिळवलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागल्याने सर्वंच भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. दरम्यान भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या पराभवाचे कारण सांगितले असून त्याने ट्विट करत नेमकं भारतीय संघाचं नेमकं काय चूकलं हे सांगितलं आहे. (Sachin Tendulkar Tells The reason Why India Lost WTC Final after losing Virat Kohli Cheteshwar Pujara Wicket early)

सचिनने भारतीय संघातील फलंदाजाकडून चूक झाली असल्याचं सांगितल. फलंदाजानी न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर संयमाने फलंदाजी करणं गरजेच होत. खास करुन विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी दिवसाची सुरुवात केल्यावर दोन ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानेच सामना भारताच्या हातातून निसटला असल्याचं सचिन म्हणाला.

काय आहे ट्विट?

ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर म्हटलाय की, ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विजयाबद्दल न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. तुमचा संघ अप्रतिम होता. भारतीय संघाने त्यांच्या कामगिरीने निराश केले. मी आधीच सांगितले होते की सहाव्या दिवशीच्या पहिल्या 10 ओव्हर अत्यंत महत्त्वाच्या असून त्या कोहली आणि पुजाराने योग्यरित्या खेळण गरजेचं होतं. पण दोघेही अगदी 10 बॉल्सच्या फरकाने बाद झाले. ज्यामुळे संपूर्ण संघावर प्रेशर आले.’

हे ही वाचा :

WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराटची मोठी वक्तव्य, कसोटी संघात होणार बदल, काय म्हणाला कोहली?

(Sachin Tendulkar Tells The reason Why India Lost WTC Final after losing Virat Kohli Cheteshwar Pujara Wicket early)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.