AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Record: 27 बॉलमध्ये वेगवान शतक, 18 सिक्ससह 144 धावा, साहिल चौहानची विध्वंसक खेळी

Sahil Chauhan Fastest century in T20I: साहिल चौहानने झंझावाती खेळी करत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय. साहिलने आपल्या खेळीत 18 सिक्स ठोकले.

World Record: 27 बॉलमध्ये वेगवान शतक, 18 सिक्ससह 144 धावा, साहिल चौहानची विध्वंसक खेळी
sahil chauhan
| Updated on: Jun 17, 2024 | 10:26 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार सुरु आहे. सुपर 8 साठी 8 टीम निश्चित झाल्या आहेत. येत्या 19 जूनपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे. अशात क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. एस्टोनियाच्या 32 वर्षीय साहिल चौहान याने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. साहिलने ऐतिहासिक कामगिरी करत साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. साहिलने अवघ्या 27 बॉलमध्ये T20I क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. साहिलने नामिबियाच्या निकोल लोफ्टी-ईटन याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय. निकोलने 33 बॉलमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये वेगवान शतक ठोकलं होतं. इतकंच नाही, तर साहिलने केलेल्या नाबाद 144 धावांच्या खेळीमुळे एस्टोनियाने सायप्रस विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

एस्टोनिया विरुद्ध सायप्रस यांच्यात टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या टी 20 सामन्यात साहिल चौहानने विजयासाठी मिळालेल्या 192 धावांचा पाठलाग करताना ही विस्फोटक खेळी केली. सायप्रसने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सायप्रसने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 191 धावा केल्या. त्यामुळे एस्टोनियाला 192 धावांचं आव्हान मिळालं. टी 20 क्रिकेटमध्ये आव्हान हे अवघडच होतं. मात्र साहिलने केलेल्या या झंझावातामुळे एस्टोनिया हे आव्हान अवघ्या 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. एस्टोनियाने 7 ओव्हर राखून 4 विकेट्सने गमावून 194 धावा केल्या. साहिलने 27 बॉलमध्ये तडाखेदार शतक झळकावलं. साहिलने अवघ्या 14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर साहिलने फक्त 13 बॉल्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं आणि विश्व विक्रम केला.

एका डावात सर्वाधिक सिक्स

दरम्यान साहिलने फक्त वेगवान शतकच ठोकलं नाही, तर एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. साहिलने फक्त 41 बॉलमध्ये 6 चौकार आणि 18 षटकारांच्या मदतीने 351.22 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 144 धावांची विजयी खेळी केली.

साहिल चौहानची विश्वविक्रमी खेळी

सायप्रस प्लेईंग ईलेव्हन: स्कॉट बर्डेकिन (कॅप्टन), अकिला कलुगाला, चमल सदुन, स्कॉट ऑस्टिन, जेम्स चिआलौफास, तरनजीत सिंग, अर्जुन शाही, मंगला गुणसेकरा, सचित्रा पाथीराना (विकेटकीपर), बुद्धिका महेश आणि नीरज तिवारी.

एस्टोनिया प्लेइंग ईलेव्हन: अर्सलान अमजद (कर्णधार), अली मसूद, स्टुअर्ट हुक, स्टीफन गूच, साहिल चौहान, बिलाल मसूद, डेव्हिड रॉबसन, मार्को वैक (विकेटकीपर), आदित्य पनवार, प्रणय घीवाला आणि काल्ले विस्लापू.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.