AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर संदीप शर्मा इमोशनल, आयपीएल लिलावातील दु:ख केलं व्यक्त

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 9 गडी राखून जिंकला. दुसरीकडे, या सामन्यात संदीप शर्माने 5 गडी बाद करून मुंबईचं कंबरडं मोडलं होतं. या कामगिरीनंतर संदीप शर्मा भावुक झाला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर संदीप शर्मा इमोशनल, आयपीएल लिलावातील दु:ख केलं व्यक्त
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 23, 2024 | 5:04 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची चमकदार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 14 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आता फक्त एका सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात संदीप शर्माच्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडलं. या सामन्यात पाच गडी बाद करत संदीप शर्माने मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर ढकललं. सामन्यानंतर संदीप शर्मा सांगितलं की, “गोलंदाजी करताना प्लान हा व्हेरिएशन आणि कटर करण्याचा होता.” संदीप शर्माने चार षटकात 4.50 च्या इकोनॉमी रेटने 18 धावा देऊन पाच गडी बाद केले. इतक्या जबरदस्त कामगिरीनंतर संदीप शर्माने दोन वर्षापूर्वी अनसोल्ड राहिला असल्याचं शल्य बोलून दाखवलं आहे.

सामन्यानंतर संदीप शर्मा म्हणाला की, “दुखपतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत चांगलं वाटत आहे. टी20 स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहे. मी दोन दिवसांपूर्वीच फिट झालो आहे. फिटनेसनंतर सामना खेळला, आता आणखी बरं वाटत आहे. खेळपट्टी संथ आणि खालच्या बाजूने होती. त्यामुळे माझी योजना व्हेरिएशन आणि कटर गोलंदाजी करण्याची होती. जर तुम्ही शेवटी गोलंदाजी करत असाल तर मोठं हृदय (सर्वाधिक धावा येऊ शकतात) ठेवणं गरजेचं आहे. आयपीएलमध्ये गोलंदाज दबावात असल्याचं दिसलं आहे.”

अनसोल्ड प्रकरणावर बोलताना संदीप शर्माने सांगितलं की, “दोन वर्षांपूर्वी मला कोणीही खरेदी केलं नव्हतं. मला रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील केलं होतं. यासाठी मी प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहे.” संदीप शर्मा अनसोल्ड राहिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र त्यानंतर राजस्थान रॉयल्सने रिप्लेसमेंट म्हणून त्याचा समावेश करून घेतला. तसेच आयपीएल 2024 मध्ये रिटेन केलं. आता दुखापतीनंतर 5 विकेट घेत त्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

मुंबई इंडियन्सने 19 षटकात 6 गडी गमवून 176 धााव केल्या होत्या. शेवटचं षटक कर्णधार संजू सॅमसनने संदीप शर्माकडे सोपवलं. पहिल्याच चेंडूवर सेट बॅट्समन तिलक वर्माला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या गेराल्ड कोएत्झीला आपलं खातंही खोलू दिलं नाही. तिसऱ्या चेंडूवर पियुष चावलाने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर टीम डेविडने फटका मारला. पण धाव न घेता स्ट्राईक जवळ ठेवली. पाचव्या चेंडूवर उंच फटका मारला पण बाद झाला. सहाव्या चेंडूवर बुमराहने 2 धावा काढल्या. संदीप शर्माने शेवटच्या सहा चेंडूवर 3 गडी बाद करत तीन धावा दिल्या.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.