AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीची भेट एकदा नाही तर… संजय बांगरच्या मुलीने सांगितलं सर्वकाही

संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिची चर्चा होत आहे. अनाया बांगरला विराट कोहलीबाबत काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा तिने विराट कोहलीची भेट कधी झाली होती याबाबत खुलासा केला आहे.

विराट कोहलीची भेट एकदा नाही तर... संजय बांगरच्या मुलीने सांगितलं सर्वकाही
विराट कोहली आणि अनाया बांगरImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2025 | 8:45 PM
Share

विराट कोहलीने क्रिकेटविश्वात आपल्या खेळीने नावलौकीक मिळवला आहे. पण नुकतंच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे चाहते त्याच्या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाने नाराज झाले आहेत. दुसरीकडे, संजय बांगरची मुलगी अनायाने विराट कोहलीबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अनाया बांगरने फिल्मीज्ञानला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने विराट कोहलीबाबतच्या काही गोष्टी सांगितल्या.  इतकंच काय तर विराट कोहलीला एकदा नाही तर अनेकदा भेटल्याचं देखील सांगितलं. विराट कोहलीची भेट कधी झाली आहे का? असा प्रश्न मुलाखतकाराने विचारल्यानंतर अनायाने याबाबत सांगितलं. अनाया बांगरने सांगितलं की, वडील संजय बांगर यांच्यासोबत विराट कोहली कायम ट्रेनिंगसाठी यायचा. त्यावेळी माझी आणि विराट कोहलीची अनेकदा भेट झाली आहे. तसेच त्याच्यासोबत क्रिकेटचे धडेही गिरवले आहेत. इतकंच काय तर विराट कोहली ट्रेनिंगवेळी खूपच मजेशीर वागायचा, असं देखील ती सांगण्यास विसरली नाही. पण एकदा का विराट कोहलीने बॅट हाती घेतली की त्याचं पूर्ण लक्ष्य हे त्याच्या फलंदाजीवर असायचं.

अनायाने विराट कोहलीला काय विचारलं होतं?

मुलाखतीत अनायाने सांगितलं की, ट्रेनिंग दरम्यान एकदा विराट कोहलीला विचारलं होतं की तो प्रेशर कसं हँडल करतो? तेव्हा विराट कोहलीने अनायाला सांगितलं की, फक्त आपल्या क्षमतेनुसार टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय सर्व फोकस आपली तयारी प्रत्यक्षात मैदानात उतरवण्यावर असतो. मुलाखतकाराने अनायला विचारलं की, विराट कोहलीकडून काय शिकायला मिळालं? तेव्हा अनायाने सांगितलं की, त्याच्यासारखं फियरलेस व्हायला आवडेल.

संजय बांगरच्या मुलाने केलं लिंग बदल

अनाय बांगर मुलगी होण्यापूर्वी आर्यन बांगर होता. संजय बांगरचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती. तसेच क्रिकेटही खेळायचा. डावखुरा फलंदाजी करायचा आणि फिरकी गोलंदाजी करत होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने लिंग बदल केला आणि आर्यन ऐवजी अनाया झाला. दरम्यान, अनायाने मुलाखतीत विराट कोहलीबाबत जे काही सांगितलं तेव्हा तो आर्यन बांगर म्हणून क्रिकेट खेळायचा. तसेच वडिलांसोबत क्रिकेट ट्रेनिंगसाटी मैदानात जायचा.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.