AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : संजू सॅमसनने 30 मिनिटं जे काही केलं त्यामुळे फॉर्मात परतणार! प्रशिक्षकही म्हणाला…

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत. भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे औपचारिक सामने असणार आहेत. पण असं असलं तर भारतीय खेळाडूंसाठी हे दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. खासकरून संजू सॅमसनसाठी...

IND vs NZ : संजू सॅमसनने 30 मिनिटं जे काही केलं त्यामुळे फॉर्मात परतणार! प्रशिक्षकही म्हणाला...
संजू सॅमसनने 30 मिनिटं जे काही केलं त्यामुळे फॉर्मात परतणार! प्रशिक्षकही म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Jan 27, 2026 | 9:53 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडियाने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याची प्रचितीही आली आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका सुरुवातीच्या तीन सामन्यात भारताने 3-0 ने जिंकली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही सूर गवसला आहे. पण सलामीला फलंदाजीला येणाऱ्या संजू सॅमसनला काही सूर गवसत नाही. त्यामुळे चिंतेचा विषय ठरला आहे. संजू सॅमसनने तीन सामन्यात फक्त 16 धावा केल्या आहेत. तिसऱ्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्याची मागणी आता जोर धरत आहे. त्याच्या ऐवजी इशान किशनला ओपनिंगला पाठवण्याची चर्चा रंगली आहे. पण पुढच्या सामन्यात संजू सॅमसनवरील शुक्लकाष्ठ दूर होईल अशी आशा आहे.

वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असल्याने संघ व्यवस्थापन प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल करणार नाही. म्हणजेच संजू सॅमसनवर विश्वास टाकला जाईल. चौथ्या टी20 सामन्यापूर्वी भारताचा गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कलने सॅमसनला आत्मविश्वास मिळवण्यासाठी एक खेळी खूप आहे. मॉर्ने मॉर्केलने सांगितलं की, ‘संजू सॅमसन आत्मविश्वास आणि फॉर्म परत मिळवण्यासाठी फक्त एक डाव दूर आहे. आमच्यासाठी वर्ल्डकप दिशेने कूच करताना खेळाडूंनी योग्य वेळी चांगली खेळी करणं आवश्यक ठआहे. तो चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेत आह आणि चांगले शॉटही खेळत आहे.’ संघ व्यवस्थापन संजू सॅमसनकडे लक्ष ठेवून आहेत. पण त्याची एक खेळी या मालिकेत येईल की टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हे सांगणं कठीण आहे.

संजू सॅमसनने 27 जानेवारीला सराव शिबिरात भाग घेतला. या शिबिरात भाग घेणं अनिवार्य नसतं. पण संजू सॅमसनने भाग घेतला. त्याने जवळपास 30 मिनिटं नेटमध्ये सराव केला. यावेळी त्याला अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीने गोलंदाजी केली. यावेळी त्याला काही अडचणही आली. पण काही काळ काढल्यानंतर त्याच्या शैलीत फटकेबाजी केली. आता 30 मिनिटांच्या सरावातून काय निघतं हे सामन्यात दिसून येईल. 28 जानेवारीला विशाखापट्टणममध्ये चौथा टी20 सामना होणार आहे.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?