AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरफराज खान की….! बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घातला घोळ, झालं असं की…

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेतील मुंबईचा पहिला सामना जम्मू काश्मीरशी होत आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी मुंबईला सुरुवातीला धक्के बसले. पण त्यानंतर सिद्धेश लाडने डाव सावरला. पण या सरफराजबाबत सामन्यात एक चूक भर मैदानात घडली.

सरफराज खान की....! बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घातला घोळ, झालं असं की...
सरफराज खान की....! बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घातला घोळ, झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Oct 15, 2025 | 8:30 PM
Share

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेची मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. प्रत्येक संघातील भविष्यातील स्वप्न उराशी बाळगून देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहेत. या स्पर्धेत नशिब चमकलं तर टीम इंडियाचं दार भविष्यात उघडेल असा विश्वास खेळाडूंना आहे. मुंबई संघातून खेळणाऱ्या बऱ्याच खेळाडूंना हा विश्वास आहे. त्यामुळे नाव कमवण्यासाठी चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्न करत आहे. नावात काय आहे असं म्हणतात. पण नाव झालं की पुढचा विचार होतो. त्यामुळे नावासाठीच धडपड सुरु असते. पण मुंबई आणि जम्मू काश्मीर सामन्यात नावाबाबत अशी चूक पाहायला मिळाल. मुंबईकडून सलामीला मुशीर खान आणि आयुष म्हात्रे आला होता. पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मुशीर खान बाद होत तंबूत परतला. मुंबईला हा मोठा धक्का होता. पण मुशीर खानच्या जागी स्कोअर बोर्डवर सरफराज खानचं नाव लिहिलं होतं. सरफराजच्या नावापुढे शून्य असं लिहिलं होतं. तेव्हा सरफराज खान खेळण्यासाठीही उतरला नव्हता.

बीसीसीआयच्या या चुकीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. खरं तर स्कोअर बोर्डवर मुशीर खान आणि आयुष म्हात्रेचं नाव असायला हवं होतं. पण मुशीर ऐवजी त्याचा मोठा भाऊ सरफराज खानचं नाव लिहिलं गेलं. सरफराज खानचं नाव ओपनिंगला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांना वाटलं की मुंबईने सरफराज पुढे करत मोठा प्रयोग केला असेल. पण नंतर चूक लक्षात येताच बीसीसीआयकडून दुरूस्ती करण्यात आली. स्कोअर बोर्डवर सरफराजच्या जागी मुशीर खानचं नाव लिहिण्यात आलं.

दुसरीकडे, सरफराज खानही खास करू शकला. मुंबईच्या 74 धावांवर 3 विकेट पडल्यानंतर सरफराज खान मैदानात उतरला. सिद्धेश लाडसोबत त्याने 67 धावांची भागीदारी केली. पण दुर्दैवाने 42 धावांवर असताना धावचीत झाला. त्यामुळे त्याचं अर्धशतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. त्यामुळे मुंबईची स्थिती नाजूक झाली. पण सिद्धेश लाडने 156 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकार मारत 116 धावा केल्या. तर शम्स मुलानीने नाबाद 79 धावा, तर आकाश आनंद नाबाद 15 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 5 गडी गमवून 336 धावा केल्या आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.