AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियममधील पिचवर भूत? शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याने खळबळ!

यंदा वनडे वर्ल्ड कप 2023 चं यजमानपद भारताकडे आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार असल्याची माहिती आहे. मात्र यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ते मैदान नाकारत दुसऱ्या मैदानावर सामना आयोजित करण्याची मागणी केली आहे.

World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियममधील पिचवर भूत? शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याने खळबळ!
| Updated on: Jun 16, 2023 | 6:18 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 मध्ये बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाइब्रिड मॉडेलला सहमती दिली आहे. पाकिस्तानकडे यजमान पद असलं तरी फक्त 4 सामने पकिस्तानमध्ये होणार आहेत. बाकी सर्व सामने हा श्रीलंकेमध्ये पार पडणार आहेत. आशिया कप आता होणार असून 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर यादरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

यंदा भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये भारत-पाकिस्तानचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या मैदानाऐवजी काही पर्याय दिले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या मागणीमुळे पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्यांनाच सुनावलं आहे.

नरेंद्र मोदी स्टेडिअममधील पिचवर भूत आहे का?  नरेंद्र मोदी स्टेडिअममधील पिचवर भूत आहे का? जा खेळा आणि जिंकून या, या आव्हानावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विजय मिळवणं आहे. खचाखच भरलेल्या भारतीय चाहत्यांसमोर जिंका आणि दाखवून द्या, असं  म्हणत शाहिद आफ्रिदीने नाराजी व्यक्त केली आहे.

आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली तेव्हा, पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी त्यांना सांगितले की, पाकिस्तानला नॉक-आऊट सामना असल्याशिवाय त्यांचे सामने अहमदाबादमध्ये नका ठेवू. पीसीबीच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितल्यानुसार त्यांनी, आयसीसीला त्यांचे सामने चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान,  या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये प्रस्तावित आहे, पण पीसीबी भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळण्यास तयार नसल्याची माहिती समजत आहे.

शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.