अष्टपैलू शाकीब अल हसनचं टेन्शन वाढलं, पाकिस्तानला हरवण्याचा आनंद लुटण्याऐवजी घ्यावा लागला असा निर्णय

बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करत इतिहास रचला आहे. कसोटी मालिका नुसती जिंकली नाही तर पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला आहे. आता बांग्लादेश संघ भारतासोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण अष्टपैलू शाकिब अल हसनचं टेन्शन वाढलं आहे.

अष्टपैलू शाकीब अल हसनचं टेन्शन वाढलं, पाकिस्तानला हरवण्याचा आनंद लुटण्याऐवजी घ्यावा लागला असा निर्णय
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 8:00 PM

बांगलादेशने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने पाकिस्तानसारख्या दिग्गज संघाला त्यांच्याच भूमीवर लोळवलं आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने मात देत व्हाईटवॉश दिला. बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. आता बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध दोन सामन्याची कसोटी आणि टी20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी बांगलादेशचा संघ ढाक्याला गेला आहे आणि त्यानंतर भारतात येणार आहे. पण बांग्लादेश संघासोबत शाकिब अल हसन मायदेशी गेला नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमदने सांगितलं की, बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन सहकाऱ्यांसोबत मायदेशी आला नाही. शाकीब अल हसन इंग्लंडला गेला आहे. तिथे सरे संघासाठी खेळताना दिसणार आहे.

बांगलादेशचा संघ 3 सप्टेंबरला दोन गटात पाकिस्तानहून रवाना झाला होता. पहिला गट संयुक्त अमीरातहून रात्री 11.30 वाजा घरी आला. त्यानंतर दुसरा गट रात्री 2 वाजता कतारहून मायदेशी आला. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमदने सांगितलं की, शाकीबने सरे संघासाठी खेळण्यासाठी आधीच ना हरकत प्रमाणपत्र घेतलं होतं. ‘त्याने मी बीसीबी अध्यक्ष होण्यापूर्वीच सरेसाठी खेळण्यासाठी एनओसी घेतली होती.’, असं फारुख अहमदने सांगितलं.  अष्टपैलू शाकीब अल हसन बांगलादेशची संघाची ताकद आहे. त्याचा अनुभव बांगलादेशला कायम महत्त्वाचा ठरला आहे. पण पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना सुरु असताना त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बांगलादेशमध्ये मागच्या महिन्यात मोठी उलथापालथ झाली आहे. शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडून पळून जावं लागलं. त्याच शाकीब अल हसन हा हसीना यांच्या पक्षाचा खासदार आहे. बांगलादेशमधील हिंसाचाराप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मायदेशी परतला तर त्याला अटक होण्याची भीती आहे. दुसरीकडे, शाकीब अल हसनचं कुटुंब अमेरिकेत आहे. जर भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही तर तो थेट तिथूनच अमेरिकेला रवाना होण्याची शक्यता आहे.आता पुढच्या घडामोडी कशा घडतात याकडे लक्ष लागून आहे.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.