Shane Warne : शेन वॉर्न अनकेदा अडकलेला वादाच्या भोवऱ्यात, दिग्गज फिरकीपटू ठरलेला वादग्रस्त

शेन वॉर्न हा दिग्गज फिरकीपटू असला तरी अनेकदा तो वादात अडकला. शेन वॉर्नच्या आयुष्यातील काही वादाचे प्रसंग देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरले.

Shane Warne : शेन वॉर्न अनकेदा अडकलेला वादाच्या भोवऱ्यात, दिग्गज फिरकीपटू ठरलेला वादग्रस्त
Shane WarneImage Credit source: TV9 Marathi You Tube
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 9:33 PM

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया (Australia)चा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे निधन झाले आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेन वॉर्नचा मृत्यू थायलंडमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. शेन वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. शेन वॉर्न क्रिकेट विश्वातील प्रमुख फिरकी गोलंदाजांपैकी एक होता. शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध (England) शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र, शेन वॉर्न हा दिग्गज फिरकीपटू असला तरी अनेकदा तो वादात अडकला. शेन वॉर्नच्या आयुष्यातील काही वादाचे प्रसंग देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरले.

  1. बुकींशी संपर्क :शेन वॉर्न आणि मार्क वॉ यांच्यावर बुकींशी संपर्क केल्याचा आरोप झाला होता. 1994 च्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय बुकींना खेळपट्टीची माहिती आणि वेदर कंडिशन पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
  2. स्टीव्ह वॉ स्वार्थी खेळाडू : स्टीव्ह वॉच्या नेतृत्त्वात खेळत असताना 1999 मध्ये वेस्ट इंडिज विरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात वगळ्यात आलं होतं. 2016 मध्ये शेन वॉर्ननं स्टीव्ह वॉ हा स्वार्थी खेळाडू असल्याचा आरोप 2016 मध्ये केला होता.
  3. ब्रिटीश नर्ससोबत असभ्य भाषेत संवाद :2000 मध्ये शेन वॉर्न यानं ब्रिटीश नर्स सोबत असभ्य भाषेत संवाद सादला होता. शेन वॉर्न सातत्यानं मेसेज करत असल्याचा दावा त्या नर्सनं केला होता. यानंतर शेन वॉर्नला उपकप्तानपद गमवावं लागलेल. शेन वॉर्न आणखी एका ब्रिटिश महिलेशी संबंधित प्रकरणामुळं वादग्रस्त ठरला होता.
  4. शेन वॉर्न यानं 2008 मध्ये सिगारेटपासून मुक्ती देण्यासाठी पर्याय असलेल्या निकोरेटची जाहिरात घेतली होती. मात्र, 2008 मध्ये सिगारेट ओढतानाचे त्याचे फोटो व्हायरल झाले होते. 2003 मध्ये प्रतिबंधित औषधे घेतल्यानं वॉर्नला कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.
  5. 2007 मध्ये घटस्फोट : शेन वॉर्नच्या सगळ्या प्रकरणांना कंटाळून त्याच्या पत्नीनं त्यच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये त्याची पत्नी त्याचापासून वेगळी झाली. यानंतर ब्रिटीश अभिनेत्री लिझ हर्ली याच्यासोबत देखील शेन वॉर्नचे संबंध होते. दोघांची एंगेजमेंट देखील झाली होती. मात्र, त्यांच्या नात्याचं लग्नात रुपांतर होऊ शकलं नाही.
  6. वेलेरी फॉक्सचा विनयभंग: शेन वॉर्न यानं सप्टेंबर 2017 मध्ये वेलेरी फॉक्सचा विनयभंग केल्याचं प्रकरण देखील गाजलं होतं

इतर बातम्या

Shane Warne : फक्त गोलंदाजीच नाही तर यामुळेही चांगलाच चर्चेत आला होता शेन वॉर्न

Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.