श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान नाही, जॅक्सनचं हृदय तुटलं, ट्विट करुन म्हणतो, ‘मी पुन्हा येईन..!’

दमदार प्रदर्शन करुनही शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याला संधी मिळाली नाही. त्याने ट्विट करुन आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच मी पुन्हा प्रयत्न करुन संघात जागा मिळवेन, अशा आशयाचं ट्विट केलं आहे. (Sheldon Jackson Sad tweet After not Select indian team For Srilanka Tour)

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान नाही, जॅक्सनचं हृदय तुटलं, ट्विट करुन म्हणतो, 'मी पुन्हा येईन..!'
Sheldon Jackson

मुंबई : भारतीय संघाची श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Sri Lanka) घोषणा करण्यात आली आहे. एकूण 20 खेळाडूंची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रथमच संघाचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे (bhuvneshwar Kumar) उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. या संघात काही सिनिअर्स, काही नवोदित, काहींना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. मात्र दमदार प्रदर्शन करुनही शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याला संधी मिळाली नाही. त्याने ट्विट करुन आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच मी पुन्हा प्रयत्न करुन संघात जागा मिळवेन, अशा आशयाचं ट्विट केलं आहे. (Sheldon Jackson Sad tweet After not Select indian team For Srilanka Tour)

जॅक्सनचं हृदय तुटलं!

जॅक्सनने नेटमध्ये प्रॅक्टिस करत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. 34 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तो अनेक प्रकारचे शॉट्स खेळतो आहे. तसंच या व्हिडीओला त्याने आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणारं कॅप्शन दिलं आहे. ‘सन विल राईज… पुन्हा प्रयत्न करेन…’ असं म्हणत पुन्हा प्रयत्न करुन संघात जागा मिळवेन, अशा आशयाचं ट्विट त्याने केलंय.

संघात निवड होईल, अशी आशा होती पण…

शेल्डन जॅक्सन हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. विकेट कीपर फलंदाज म्हणून तो कोलकात्याच्या संघाकडून खेळतो. भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी आपली संघात निवड होईल, अशी त्याला आशा होती. मात्र 20 सदस्यीय संघात आपली निवड न झाल्याने शेल्डन जॅक्सन निराश झालाय. त्याने आपलं दु:ख एका ट्विटमधून व्यक्त केलंय. जे ट्विट आता कमालीचं व्हायरल होतंय.

जॅक्सनचं धडाकेबाज प्रदर्शन, तरीही श्रीलंका दौऱ्यात निवड नाही!

शेल्डन जॅक्सनने देशांतर्गत क्रिकेट सामन्यांत धडाकेबाज कामगिरी केली आहे. गेल्या दोन रणजी करंडकाच्या मोसमात त्याने 800 हून अधिक धावा केल्या आहेत. शेल्डनने प्रथम श्रेणी सामन्यात जवळपास 50 च्या सरासरीने 5634 धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए सामन्यात त्याने 37.42 च्या सरासरीने 2096 धावा केल्या आहेत. टी -20 सामन्यात त्याची सरासरी 25.86 आहे, तर स्ट्राइक रेट 117.09 आहे. शेल्डनने टी -20 सामन्यात 1240 धावा केल्या आहेत.

नवीन 5 खेळाडूंना संधी पण जॅक्सनला संघात स्थान नाही!

चेतन साकारिया, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, कृष्णाप्पा गौतम आणि नितीश राणा यांचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. पण 34 वर्षीय शेल्डन जॅक्सनला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे नवीन खेळाडूंची वर्णी लागताना आपल्याला स्थान मिळालं नाही, याचं त्याला अधिक दु:ख आहे.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, तर दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 16 आणि 18 जुलै रोजी खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर 21, 23 आणि 25 जुलै रोजी तीन सामन्यांची टी -20 मालिका होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया

Sheldon jackson Sad tweet After not Select indian team For Srilanka Tour

हे ही वाचा :

IND vs SL : कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शिखर धवनचं पहिलं ट्विट, म्हणतो, ‘देशाचं नेतृत्व करताना…’

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या या 2 मराठमोठ्या खेळाडूंना संधी!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI