Duleep Trophy: श्रेयस अय्यरचा खेळ फक्त 14 चेंडूत संपला, कर्णधारपदाची धुरा आणि निवडीआधीच फेल
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यातील सामना ड्रॉ झाला. पण श्रेयस अय्यरच्या खेळीमुळे चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. कारण श्रेयस दोन्ही डावात फेल गेला. त्यात पहिल्या डावातील पिछाडीमुळे अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे.

श्रेयस अय्यर हे क्रिकेटविश्वातील सध्या चर्चेत असलेलं नाव आहे. कारण देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतरही त्याला आशिया कप स्पर्धेत स्थान मिळालं नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसला. मात्र या स्पर्धेत त्याने चाहत्यांना निराश केलं. सेंट्रल झोन विरूद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही फेल गेला. श्रेयस अय्यरने पहिल्या डावात 25 धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या डावात फक्त 14 धावा करून बाद झाला. खरं तर श्रेयस अय्यरकडून फार अपेक्षा होत्या. कारण ही स्पर्धा सुरु असताना बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा टाकली आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपद सोपवलं आहे. त्यामुळे या माध्यमातून श्रेयस अय्यर टीम इंडियात कमबॅक करेल असी आशा आहे. पण दुलीप ट्रॉफीत फेल गेल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 ऑक्टोबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. भारताला या मालिकेतून विजयी टक्केवारी वाढवण्याची नामी संधी आहे. त्यामुळे इंग्लंडला गेलेल्या संघात काही सुधारणा करण्याची शक्यता आहे. त्यात करूण नायरच्या जागी श्रेयस अय्यलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मकडे लक्ष लागून आहे. श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली तर नक्कीच त्याला टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळेल.
दुसरीकडे, वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यातील सामना ड्रॉ झाला. मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळे सेंट्रल झोन संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. पहिल्या डावात वेस्ट झोनने 438 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सेंट्रल झोनने 600 धावा करत आघाडी घेतली होती. पहिल्या डावातील आघाडीमुळे सेंट्रल झोनला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साउथ झोन आणि नॉर्थ झोन हे आमनेसामने आले होते. मात्र हा सामना देखील ड्रॉ झाला. पण पहिल्या डावातील आघाडीमुळे साउथ झोनला अंतिम फेरीत स्थान मिळालं आहे. आता अंतिम फेरीत सेंट्रल झोन आणि साउथ झोन यांच्यात सामना होणार आहे.
