AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“..त्यामुळे रोहितसह बॅटिंग करताना आणि खेळायला येणाऱ्यांवर दबाव..”, शुबमनची हिटमॅनच्या कामगिरीवर प्रतिक्रिया

Shubman Gill On Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. रोहितच्या या स्थितीवरुन टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याने काय म्हटलं?

..त्यामुळे रोहितसह बॅटिंग करताना आणि खेळायला येणाऱ्यांवर दबाव.., शुबमनची हिटमॅनच्या कामगिरीवर प्रतिक्रिया
shubman gill on rohit sharma performanceImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 05, 2025 | 10:05 AM
Share

टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर तिसरी एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी 20I मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. शुबमन गिल याने सामन्याच्या काही तासांआधी उपकर्णधारपदाची जबबादारी मिळाल्यानंतर कसं वाटतयं? याबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच शुबमनने कर्णधार रोहितच्या कामगिरीबाबतही मत मांडलं.

शुबमन गिल उपकर्णधारपदाबाबत काय म्हणाला?

“मी उपकर्णधारपदाकडे एक आव्हान म्हणून पाहतो. मी आधी वैयक्तिक कामगिरी आणि त्यानंतर जर रोहित भाईला गरज पडली तर मला काय वाटतं हे सांगून नेतृत्व करेन. मी काय विचार करतो हे रोहितला सांगणं माझी जबाबदारी आहे. एका मालिकेतील कामगिरीवरुन संपूर्ण संघाच्या कामगिरीबाबत आकलन करु शकत नाही. अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या काही मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे”, असं शुबमनने म्हटलं.

रोहितबाबत काय म्हणाला?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला. तसेच रोहितला रणजी ट्रॉफीतही काही करता आलं नाही. “रोहित गेल्या दीड वर्षांपासून जशी बॅटिंग करतोय त्यामुळे साऱ्या सामन्याचा चेहरामोहरा बदलतो. रोहित सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे रोहितसोबत बॅटिंग करणाऱ्या आणि बॅटिंगसाठी येणारा पुढील फलंदाजांवरील दबाव कमी होतो. त्यामुळे टीमला खूप मदत मिळते”, असंही शुबमनने म्हटलं.

उपकर्णधार शुबमन गिल

वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.

Follow Us
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!