शुबमन गिलला टी20 संघाचा उपकर्णधार करण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं की…
आशिया कप स्पर्धेत शुबमन गिलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. यासह त्याचं टी20 संघात पदार्पण झालं आहे. पण त्याच्याकडे उपकर्णधारपद देण्याचं कारण काय? कारण यापूर्वी उपकर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे होती. असं अचानक काय झालं? कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. 15 सदस्यीय संघाची घोषणा मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर याने सूर्यकुमारच्या उपस्थितीत केली. या संघात शुबमन गिलची एन्ट्री झाली असून त्याच्या उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. कारण यापूर्वी उपकर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलच्या खांद्यावर होती. पण असं अचानक निर्णय घेण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींनी विचारला आहे. असं असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, शुबमन गिल पहिल्यापासूनच टी20 वर्ल्डकप 2026 संघाचा भाग होता. फक्त तो हा फॉर्मेट खेळत नव्हता. कारण त्याच्या कसोटी संघाची धुरा होता. त्यामुळे संजू सॅमसन त्याच्या जागी ओपनिंग करत होता.
सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘जेव्हा आम्ही श्रीलंका दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा टी20 मालिकेत शुबमन गिल उपकर्णधार होता. तिथूनच आमचं टी20 वर्ल्डकपचं मिशन सुरु झालं होतं. त्यानंतर गिल व्यस्त झाला. तो दुसऱ्या मालिकेत खेळत होता. या दरम्यान तो कसोटी खेळत होता. त्याच्या गैरहजेरीत संजू सॅमसनने ओपनिंग केली. आता गिलच्या पुनरागमनामुळे आम्ही खूश आहोत.’ शुबमन गिलने आयपीएल 2025 स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यात 50 च्या सरासरीने 650 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 155चा होता. इतकंच काय तर त्याने या स्पर्धेत 24 षटकार मारले होते. त्यामुळे त्याला संघात घेणं योग्यच आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शुबमन गिलची कामगिरी तशी काही खास नाही. त्याने 21 टी20 सामने खेळले असून यात त्याने 3042 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहे. या फॉर्मेटमध्ये त्याने एक शतक आणि 3 अर्धशतक ठोकले आहेत. या फॉर्मेटमध्ये त्याचा नाबाद 126 हा बेस्ट स्कोअर आहे. शुबमन गिलला आशिया कप स्पर्धेत ओपनिंग करायला मिळणार यात काही शंका नाही. उपकर्णधार असल्याने प्लेइंग 11 मध्ये असणारच आहे. त्यामुळे त्याला आशिया कप स्पर्धेत सिद्ध करण्याची संधी आहे. भारताचा साखळी फेरीतील पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे.
