Palash-Smriti: पलाशकडून गुडन्यूज? लवकरच स्मृती मानधनासोबत लगीन गाठ, अपडेट काय?
Palaash Muchhal-Smriti Mandhana Wedding: गायक पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना यांची लगीन गाठ लवकरच बांधल्या जाणार आहे. गायकाने विवाहाच्या तारखेविषयी एक पोस्ट केली. ती सध्या व्हायरल होत आहे. काय आहे अपडेट?

Palaash Muchhal-Smriti Mandhana Marriage: गायक पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या लग्नाचा मध्यंतरी चांगलाच विचका झाला. त्यानंतर पलाशने स्मृतीला फसवल्याचे आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी पलाशला अनफॉलो केल्याच्या बातम्या समोर आल्या. तेव्हापासून या दोघांचे लग्न होणार की नाही यावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या लग्नाविषयी अजून एक वृत्त समोर येत आहे. समाज माध्यमावर स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची एक पोस्ट व्हायरल होत आहे. काय आहे यामागील सत्य?
लग्नाची तारीख काय?
गायक पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी लग्न करणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे हे लग्न टळले. हे लग्न लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत होते. तर आता नव्याने येत असलेल्या वृत्तानुसार, हे लग्न येत्या रविवारी होणार असल्याचे समजते. पलाश आणि स्मृती या दिवशी लग्नगाठ बांधतील. या कार्यक्रमाला अगदी मोजकेच लोक उपस्थित असतील. सिंगरच्या पोस्टनुसार, हे लग्न सांगली येथेच होईल. लग्नापूर्वीच्या विधी सुरू झाल्या आहेत. दोन्ही कुटुंबात स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची दणक्यात तयारी सुरु असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण ही पोस्टच चुकीची आणि संभ्रम निर्माण करणारी असल्याचे समोर येत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ती डिलीट करण्यात आली आहे.
View this post on Instagram
पलाशवर अनेक आरोप
23 नोव्हेंबर रोजी क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची धूम सुरु होती. लग्न सोहळ्यासाठी अगदी काही तास उरले असतानाच हा आनंदसोहळा नाराजीत बदलला. स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. या दरम्यान स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून लग्नाशी संबंधित छायाचित्र आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत.
लग्न टळल्यानंतर पलाशवर स्मृतीला फसवल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण यावर दोन्ही बाजूने, त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने कोणतेही स्पष्टीकरण, प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पलाशच्या आईने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न लवकरच होणार आहे. लग्न लांबणीवर पडल्यपासून पलाश आणि स्मृतीने त्यांच्या इन्स्टाग्राम बायोत इव्हिल आयची इमोजी ठेवली आहे. याचा अर्थ आमच्या आनंदाला जगाची नजर लागली असा आहे.
