SL vs BAN : बांगलादेशची पडझड, 5 धावांमध्येच 7 विकेट्स, श्रीलंका 77 रन्सने विजयी
Sri Lanka vs Bangladesh 1st ODI Match Result : बांगलादेशने कडक सुरुवात करत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि 244 धावांचा यशस्वी बचाव केला.

श्रीलंका क्रिकेट टीमने पाहुण्या बांगलादेश विरुद्ध दुसरा आणि अंतिम कसोटी सामना जिंकला. श्रीलंकेने यासह 2 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने आपल्या नावावर केली. त्यानंतर श्रीलंकेने बांग्लादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. श्रीलंकेने बांगलादेशचा 77 धावांनी धुव्वा उडवला आहे. श्रीलंकेने बांगलादेशसमोर 245 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बांगलादेशला 35.5 ओव्हरमध्ये 167 रन्सवर गुंडाळलं. बांगलादेशची 1 आऊट 100 अशी स्थिती होती. मात्र त्यानतंर 8 आऊट 105 अशी दुरावस्था झाली.
बांगलादेशची घसरगुंडी
बांगलादेशने विजयी धावांचा पाठलाग करताना 29 धावांवर पहिली विकेट गमावली. परवेज हुसैन इमोन 13 धावांवर आऊट झाला. त्यानंतर बांगलादेशने आक्रमक सुरुवात केली. तंजीद हसन आणि नजमुल हुसैन शांतो या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी करत बांगलादेशला चांगल्या स्थितीत पोहचवलं. त्यामुळे बांगलादेशची स्थिती 1 आऊट 100 अशी असल्याने त्यांना विजयाची संधी होती.
मात्र त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम केला. बांगलादेशने 5 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स गमावल्या. त्यामुळे बांगलादेशची 100-1 वरुन 105-8 अशी स्थिती झाली. वानिंदु हसरंगा आणि कामिंदु मेंडीस या फिरकी जोडीने धमाका करत बांगलादेशला गुंडाळलं. श्रीलंकेने बांगलादेशचं 167 धावांवर पॅकअप केलं.
बांगलादेशसाठी चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तिघांना भोपळाही फोडू दिला नाही. तर इतरांनी यजमानांच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. बांगलादेशसाठी तांझिद हसन आणि जाकेर अली या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. तांझिदने 62 तर जाकेरने 51 रन्स केल्या. ओपनर परवेझ एमोनने 13 तर नजमुल हुसैन शांतोने 23 धावा जोडल्या.
लिटॉन दास, कर्णधार मेहदी हसन मिराज या त्रिकुटाला भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांनी काही करण्याआधीच श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
श्रीलंकेसाठी वानिंदु हसरंगा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कामिंदु मेंडीस याने तिघांना आऊट केलं. तर असिथा फर्नांडो आणि महीश तिक्षाणा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत दोघांना चांगली साथ दिली.
श्रीलंकेची बॅटिंग
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेसाठी कॅप्टन चरिथ असलंका याने शतक ठोकलं. चरिथने 106 धावा केल्या. कुसल मेंडीस 45 आणि जनिथ लियानगे याने 29 धावा केल्या. तर मिलन रथनायके आणि वानिंदु हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 22 धावा केल्या.
बांगलादेशचा दणदणीत विजय
First Blood to Sri Lanka! 💪
Brilliant display by our Lions! Sri Lanka beat Bangladesh by 77 runs and take 1-0 lead in the ODI series! On to the next one!#SLvBAN #SriLanka pic.twitter.com/cwO4LSnHpl
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 2, 2025
तर इतर फलंदाज झटपट आऊट झाले. त्यामुळे श्रीलंकेला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. बांगलादेशने श्रीलंकेला 49.2 ओव्हरमध्ये 244 रन्सवर आऊट केलं. त्यामुळे बांगलादेशला विजयाची संधी होती. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल कमबॅक केलं आणि विजयी सलामी दिली. दरम्यान उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 5 जुलै रोजी आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे.
