AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशी फलंदाजांनी श्रीलंकेला रडवलं, तिसरा दिवसही डोकेदुखीचा

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरु आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशने चांगली झुंज दिली आहे. दुसऱ्या दिवशीही श्रीलंक गोलंदाजांना रडवलं.

SL vs BAN : कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशी फलंदाजांनी श्रीलंकेला रडवलं, तिसरा दिवसही डोकेदुखीचा
श्रीलंका आणि बांगलादेशImage Credit source: Twitter
| Updated on: Jun 18, 2025 | 8:18 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात झाली आहे. कसोटी स्पर्धेतील नऊ संघ आता अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढच्या दोन वर्षात जोर लावणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. तसं पाहीलं तर बांगलादेशचा संघ कसोटीत दुबळा मानला जातो. पण याच बांग्लादेश संघाने श्रीलंकेला दिवसा तारे दाखवले आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज घेऊन घेतलेला निर्णय योग्य ठरला. कारण पहिल्या डावासाठी बांगलादेशने दोन दिवस गाजवले. नजमुल हुसैन शांतो आणि मुशफिकुर रहीने यांनी शतकी खेळी तर लिटन दासची शतक 10 धावांनी हुकलं. दुसऱ्या दिवसांचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 9 गडी गमवून 484 धावांची खेळी केली. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातही बांग्लादेश श्रीलंकन गोलंदाजांना झुंजवणार असं दिसत आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 3 गडी गमवून 292 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नजमुल हुसैन शांतो हा 279 चेंडूंचा सामना करून 148 धावांवर बाद झाला. त्यानंतर मुशफिकुर रहिम 163 धावा करून तंबूत परतला. लिटन दासनेही चांगलीच झुंज दिली. त्यने 123 चेंडूत 90 धावा केल्या आणि बाद झाला. त्याचं शतक अवघ्या 10 धावांनी हुकलं. शेपटाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात यश आलं. शेवटच्या षटकात नईम हसनची विकेट मिळाली. पण अजूनही बांगलादेशच्या हाती एक विकेट आहे. हसन महमुद आणि नाहिद राणा नाबाद 0 या धावसंख्येवर खेळत आहेत . त्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सत्रात तग धरला तर श्रीलंकेची डोकेदुखी वाढेल.

बांगलादेशचे रहीम आणि लिटन दास 131 व्या षटकात फलंदाजी करत होते. तेव्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. पुन्हा सामना सुरू झाला तर रहीम-लिटन जोडी फोडण्यात मदत झाली. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो, मिलन प्रियनाथ रत्ननायके आणि थरिंदू रत्ननायके यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले आहेत. श्रीलंकसमोर आता मोठं आव्हान गाठून सामना जिंकण्याचं आव्हान आहे. आता तिसऱ्या दिवशी श्रीलंका कशी खेळी याकडे लक्ष लागून आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.