
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच मालिकेत श्रीलंका बांगलादेशवर वरचढ ठरली आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने खिशात घातली आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे या सामन्यात काही खास करता आलं नाही. संपूर्ण संघ 247 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात 458 धावांची मोठी खेळी केली. पहिल्याच डावात 211 धावांची आघाडी असल्याने बांगलादेशचा पराभव निश्चित झाला होता. बांगलादेशची आघाडी मोडून काढताना दमछाक झाली. बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 133 धावांवर बाद झाला. श्रीलंकेने हा सामना एक डाव आणि 78 धावांची जिंकला. या विजयासह श्रीलंकेने मालिका 1-0 ने जिंकली. या विजयासह श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही फायदा झाला आहे. विजयी टक्केवारी 66.67 टक्के झाली असून तिसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा याने सांगितलं की, ‘दोन्ही सामन्यांमध्ये फरक होता. गोलंदाज आणि फलंदाजांनी येथे कामगिरी केली. गोलंदाजांकडे त्यांच्या योजना होत्या आणि त्यांनी त्या योजना अंमलात आणल्या. हे आमच्यासाठी मनोबल वाढवणारे आहे, आम्ही विरोधी संघावर दबाव आणण्यात यशस्वी झालो. दिनुशाने गोलंदाजीत महत्त्वाचं यश मिळवून दिलं. जेव्हा तुमच्याकडे मजबूत बेंच स्ट्रेंथ असते तेव्हा हे एक चांगले लक्षण आहे. निस्संका तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि मला आशा आहे की तो असेच करत राहील.’
Awards | Sri Lanka vs Bangladesh Test Series 2025 | #SLvsBAN
Player of the Match: Pathum Nissanka
Player of the Series: Pathum Nissanka
Champions: Team Sri Lanka
The trophy was presented by Dr. Jayantha Dharmadasa, Vice President of Sri Lanka Cricket; Mr. Ashly de Silva, Chief… pic.twitter.com/9nT8K8SfOK— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 28, 2025
बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो म्हणाला की, ‘आम्ही ज्या पद्धतीने खेळलो ते खूप निराशाजनक होते. या कसोटीत आम्ही चांगले खेळलो नाही, त्यामुळे खूप निराश झालो. पहिल्या डावात आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती अपेक्षा पूर्ण नव्हती, त्यामुळे आम्हाला सामना गमवावा लागला. मला अजूनही वाटते की आम्हाला प्रथम फलंदाजी करायला हवी होती. आम्ही ज्या पद्धतीने बाद झालो ते पुरेसे नव्हते. पहिल्या डावात आमच्या फलंदाजीमध्ये आम्ही खूप चुका केल्या. तिसऱ्या दिवशी आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते अशा परिस्थितीत पाहून छान वाटले. मला आशा आहे की ते खेळाडू पुढे चांगले करतील.’