SL vs NZ Live Streaming : श्रीलंकेसाठी करो या मरो सामना, न्यूझीलंडला पराभूत करणार?
Sri Lanka vs New Zealand Womens World Cup 2025 Live Match Score : यजमान श्रीलंकेसाठी न्यूझीलंड विरुद्धचा सामना करो या मरो असा आहे. तसेच न्यूझीलंडसाठीही हा सामना अटीतटीचा आहे.

आयीसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. चमारी अटापटू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर सोफी डीव्हाईन न्यूझीलंडचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील चौथा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मात्र श्रीलंकेची न्यूझीलंडपेक्षा वाईट स्थिती आहे. त्यामुळे श्रीलंकेला कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. मात्र असं असलं तरी न्यूझीलंडसाठीही हा विजय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याकडे लक्ष असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना केव्हा?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना मंगळवारी 14 ऑक्टोबरला होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
दोन्ही संघांची कामगिरी
न्यूझीलंडला या स्पर्धेत आपल्या मोहिमेतील पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. न्यूझीलंडला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलं. मात्र न्यूझीलंडने 10 ऑक्टोबरला पराभवाची हॅटट्रिक टाळत विजयाचं खातं उघडलं. न्यूझीलंडलने बांगलादेशवर 100 धावांनी मात करत या स्पर्धेतील पहिलावहिला विजय साकारला. त्यामुळे न्यूझीलंडची श्रीलंकेवर मात करुन विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला 3 सामन्यांनंतरही श्रीलंका पहिल्याच विजयाच्या प्रतिक्षेत आहे. श्रीलंकेचा 3 पैकी 2 सामन्यात पराभव झालाय. तर 1 सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे श्रीलंकेला स्पर्धेत कायम राहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत न्यूझीलंड विरुद्ध जिंकावं लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी कोण मैदान मारणार? याकडे लक्ष असणार आहे.
