AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odi Series : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, धोनीच्या लाडक्या खेळाडूचा पत्ता कट, पहिला सामना कधी?

Sri Lanka vs Pakistan Odi Series 2025 : वनडे सीरिजमध्ये आशियातील 2 अनुभवी संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. श्रीलंका या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

Odi Series : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, धोनीच्या लाडक्या खेळाडूचा पत्ता कट, पहिला सामना कधी?
Matheesha Pathirana and Varun ChakravarthyImage Credit source: AP
| Updated on: Nov 08, 2025 | 1:26 AM
Share

श्रीलंका क्रिकेट टीम लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका या पाकिस्तान दौऱ्यात यजमान संघाविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर श्रीलंका टी 20i ट्राय सीरिजही खेळणार आहे. श्रीलंका या मालिकेत पाकिस्तान व्यतिरिक्त झिंबाब्वे विरुद्ध भिडणार आहे. श्रीलंकेने या दोन्ही मालिकांसाठी संघाची घोषणा केली आहे. चरिथ असलंका या दोन्ही मालिकेत श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला मंगळवार 11 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा रावळपिंडीत होणार आहे. तर 17 नोव्हेंबरपासून ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहे. त्यानंतर याच मैदानात ट्राय सीरिजमधील सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे.

वनडे टीममध्ये कुणाला संधी?

श्रीलंकेने वनडे आणि टी 20i या दोन्ही मालिकांसाठी संघात बदल केले आहेत.  एशान मलिंगा याचा दिलशन मथुशंका याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. मथुशंका हा गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने एशानला संधी देण्यात आली आहे. तसेच दुनिथ वेल्लालागे, निशान मधुशका, नुवानिदु फर्नांडो आणि मिलथ रत्नानायके या चौघांनाही वगळलं आहे. तर कमिल मिशारा, वानिंदु हसरंगा, प्रमोद मुदशन आणि कमिल मिशरा या चौघांना संधी देण्यात आली आहे.

तसेच ट्राय सीरिजसाठी श्रीलंका टी 20i टीममध्ये वेगवान गोलंदाज मथीशा पथीराणा याला संधी मिळाली नाही. मथीशाने गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नईसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच मथीशाने श्रीलंकेसाठीही वनडे आणि टी 20i क्रिकेट सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याचा या ट्राय सीरिजसाठी विचार करण्यात आलेला नाही. त्याच्या जागी असिथा फर्नांडो याला संधी मिळाली आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पाकिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरिथ असलंका (कॅप्टन), पथुम निसंका, लहिरू उदारा, कमिल मिशारा, कुसल मेंडीस, सदीरा समरविक्रमा, दुश्मंथा चमीरा, असिथा फर्नांडो, प्रमोद मदुशन, कमिंदु मेंडिस, जनिथ लियानागे, पवन रत्नायके, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि एशान मलिंगा.

ट्राय सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल मेंडीस, कुसल परेरा, कमिल मिशारा, दासुन शनाका, कमिंदु मेंडीस, भानुका राजपक्षे, जनिथ लियानागे, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षना, दुशन हेमंथा, दुश्मंथा चमीरा, नुवान तुषारा, असिथा फर्नांडो आणि एशान मलिंगा.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.