SMAT 2025: धोनीच्या गोलंदाजाने अभिषेक शर्माला जाळ्यात अडकवलं, एकाच सामन्यात दोनदा आऊट केलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत हरियाणा आणि पंजाब हे दोन संघ आमनेसामने आले होते. हा सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाजाने कमाल केली. त्याने अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत हरियाणा आणि पंजाब हे दोन संघ आमनेसामने आले होते. या स्पर्धेत पंजाबचा संघ अभिषेक शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरला आहे. पण अभिषेक शर्मासारखा तगडा कर्णधार आणि फलंदाज असूनही पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अभिषेक शर्माची कामगिरी काही खास राहिली नाही. या सामन्यात एकदा नाही तर दोनदा बाद झाला. त्याला हरियाणाच्या एकाच गोलंदाजाने दोनदा आऊट केलं. त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक होत आहे. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरियाणाने 20 षटकात 9 गडी गमवून 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं. पंजाबने 20 षटकात 7 गडी गमवून 207 धावा केल्या आणि सामना ड्रॉ झाला. सुपर ओव्हरमध्ये हरियाणाने हा सामना जिंकला.
अभिषेक शर्मा या सामन्यात पूर्णपणे फेल गेला. 208 धावांचा पाठलाग करताना त्याने 5 चेंडूत 6 धावा केल्या. त्याला अंशुल कंबोजने तंबूचा रस्ता दाखवला. त्याला अंशुल कंबोजने क्लिन बोल्ड केला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा या दोघांचा सामना झाला. यावेळी अंशुल कंबोज सुपर ओव्हर टाकण्यासाठी आला होता. त्याच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माला खातंही खोलता आलं नाही. अंशुल कंबोजने एकाच सामन्यात अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं. अंशुल कंबोज या सामन्यात विजयाचा मानकरी ठरला. दरम्यान, अंशुल कंबोज चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळतो.
हरियाणा पंजाब सामन्यात खऱ्या अर्थाना चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी मिळून 400हून अधिक धावा केल्या. हरियाणाकडून कर्णधार अंकित कुमारने 26 चेंडूत 4 षटकार आणि निशांत सिंधूने 32 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार मारत 61 धावांची खेळी केली. दुसरीकडे, पंजाबकडून अनमोलप्रीत सिंगने आक्रमक खेळी केली. त्याने 37 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार मारत 81 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
हरियाणा (प्लेइंग इलेव्हन): अंकित कुमार (कर्णधार), अर्श रंगा, निशांत सिंधू, यशवर्धन दलाल, पार्थ वत्स, सामंत जाखर, विवेक नरेश कुमार, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अर्पित राणा, युझवेंद्र चहल.
पंजाब (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (डब्ल्यू), अनमोलप्रीत सिंग, नेहल वढेरा, सलील अरोरा, सनवीर सिंग, रमणदीप सिंग, गुरनूर ब्रार, मयंक मार्कंडे, हरप्रीत ब्रार, अश्वनी कुमार.
