ग्रेग चॅपेलनंतर ग्लेन मॅक्ग्रा बजावणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका! नेमकं खरं काय ते जाणून घ्या
भारतीय संघात टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर बराच बदल झाला आहे. कोचिंग स्टाफ बदलला. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्याने टी20 आणि कसोटी संघाचा कर्णधार बदलला. असं सर्व होत असताना ग्लेन मॅक्ग्राच्या प्रशिक्षकपदाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहे. पण नेमकं काय ते जाणून घेऊयात..

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कमाल केली आहे. एकीकडे ही मालिका हातातून जाईल असं वाटत असताना 2-2 ने बरोबरीत सोडवली. यामुळे भारताच्या कोचिंग स्टाफचा जीव भांड्यात पडला. पण आता आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट होणार आहे. 9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. असं असताना सोशल मीडियावर एका चर्चेला उधाण आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून रूजू होणार आहे. पण या बातमीत खरंच काही तथ्य आहे का? की अफवांचं पेव फुटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, ग्लेन मॅक्ग्रा हा भारतीय संघाचा संभाव्य गोलंदाज प्रशिक्षक आहे. या पोस्टवर ग्लेन मॅक्ग्राचा फोटोही लावला आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पण यात काही एक तथ्य नाही. कारण या प्रकरणी कोणतंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही.
टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षख मोर्ने मोर्कलच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत याचं दर्शन घडलं आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांवर मोर्ने मोर्कलने खूपच मेहनत घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावरून अंदाज बांधता येईल. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही त्याच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या पदाला सध्या तरी धक्का लागणार नाही.
🚨 ANNOUNCEMENT🚨
🚨 BOWLING COACH 🚨
Glenn McGrath is a potential Bowling coach for the Indian cricket team. pic.twitter.com/iSV9DH2SKp
— indianTeamCric (@Teamindiacrick) August 21, 2025
आशिया कप 2025 स्पर्धेनंतर भारत आणि श्रीलंकेत टी20 वर्ल्डकप स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेला पाच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे बीसीसीआय इतकी मोठी जोखीम घेणार नाही. वर्ल्डकपच्या दृष्टीने कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल करणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ग्लेन मॅक्ग्राची बातमी खोटी आहे. यात कोणतंही तथ्य नाही. इतकंच काय तर व्हायरल होत असलेल्या बातम्यांवर बीसीसीआयने काहीच म्हणणं मांडलेलं नाही. त्यामुळे या व्हायरल पोस्टची हवा निघून गेली आहे.
