AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरापासून संघातून बाहेर, आता आशिया कप 2025 स्पर्धेत मिळणार संधी? गांगुलीची मोठी मागणी

आशिया कप 2025 स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. बीसीसीआय निवड समिती सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघाची घोषणा करेल. असं असताना सौरव गांगुलीने एका वेगवान गोलंदाजासाठी बॅटिंग केली आहे. टीम इंडियासाठी सर्व फॉर्मेटमध्ये यशस्वी वेगवान गोलंदाज ठरू शकतो.

वर्षभरापासून संघातून बाहेर, आता आशिया कप 2025 स्पर्धेत मिळणार संधी? गांगुलीची मोठी मागणी
वर्षभरापासून संघातून बाहेर, आता आशिया कप 2025 स्पर्धेत मिळणार संधी? गांगुलीची मोठी मागणीImage Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: Aug 06, 2025 | 7:30 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ असून टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्स 2025 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. उपांत्य फेरीतही भारत खेळला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं होतं. असं सर्व चित्र असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप स्पर्धेसाठी कोणता संघ निवडला याची उत्सुकता आहे. शुबमन गिल या संघात असेल की नाही? श्रेयस अय्यरचं काय? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. असं असताना सौरव गांगुलीने या स्पर्धेपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. सौरव गांगुलीचं वक्तव्य ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सौरव गांगुलीच्या मते एका खेळाडूच्या या स्पर्धेसाठी संघात समावेश केला पाहीजे. या खेळाडूने एक वर्षापूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टीम इंडियासाठी 17 टी20 सामन्यात त्याने 24.35 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत.

सौरव गांगुली काय म्हणाला?

इंडिया टुडेशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, मुकेश कुमारची निवड आशिया कप स्पर्धेसाठी व्हायला हवी. तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट घेतल्या आहे. त्यामुळे त्याला संधी मिळायला हवी. सध्या टीम इंडिया कसोटी क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळे त्याची निवड टी20 आशिया कपमध्ये व्हायला हवी. तो सर्व फॉर्मेटचा गोलंदाज आहे. त्याची वेळ नक्कीच येईल. फक्त त्याला धीर धरावा लागेल. मुकेश कुमारने 2023 मध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी खेळला होता. कसोटीत त्याने 25.57 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या होत्या. तर 6 एकदिवसीय सामन्यात त्याने 43.40 सरासरीने 5 गडी बाद केले होते.

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचं वेळापत्रक

टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. हा सामना युएईविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर वेळापत्रकानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध 14 सप्टेंबरला सामना होईल. साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमान विरुद्ध 19 सप्टेंबरला खेळला जाईल. 29 सप्टेंबरला अंतिम सामना दुबईत होणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था