IND vs SA : इंडिया-साऊथ आफ्रिका टेस्ट-वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, कॅप्टन कोण?
South Africa A tour of India 2025 : निवड समितीने एकूण 5 सामन्यांसाठी टीम जाहीर केली आहे. इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील सामने हे राजकोट आणि बंगळुरुत होणार आहेत.

टीम इंडियाने मायदेशात शुबमन गिल याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत एकतर्फी फरकाने लोळवलं. भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिकेसाठी सज्ज आहे. टीम इंडिया या दोन्ही मालिकेत एकूण 8 सामने खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया पुन्हा मायदेशात परतरणार आहे. टीम इंडिया विंडीजला घरच्या मैदानात लोळवल्यानंतर आता पुढील कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा अ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिका ए संघ इंडिया ए टीम विरुद्ध 4 दिवसांचे 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचेस खेळणार आहे. त्यानंतर 3 अनऑफिशियल वनडे मॅचेसचा थरार रंगणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने ए टीमची घोषणा केली आहे.दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत एक्स हॅन्डलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
निवड समिताने 4 दिवसांच्या 2 सामन्यांसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात दक्षिण आफ्रिकेच्या सिनिअर टीमचा कॅप्टन टेम्बा बावुमा याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र टेम्बा दुसऱ्याच सामन्यात खेळणार आहे. तसचे 3 अनऑफिशियल वनडेसाठी 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मार्क्स अॅकरमन हा दोन्ही मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिका ए संघाचं नेतृत्व करणार आहे.
सामने कुठे?
उभयसंघातील दोन्ही कसोटी सामने हे बंगळुरुत सीओई अर्थात सेटंर ऑफ एक्सीलेंसमध्ये होणार आहेत. तर वनडे सीरिजमधील तिन्ही सामने हे राजकोटमधील खंदेरीतील निरंजन शाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
अनऑफिशियल टेस्ट सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर
दुसरा सामना, 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर
अनऑफिशियल वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 13 नोव्हेंबर, राजकोट
दुसरा सामना, 16 नोव्हेंबर, राजकोट
तिसरा सामना, 19 नोव्हेंबर, राजकोट
2 मालिका आणि 5 सामने
SQUAD ANNOUCEMENT 🚨
Cricket South Africa (CSA) has today announced the South Africa A (SA A) squads for their upcoming multi-format tour to India later this month.
The four-day squad will take on the hosts in two matches at the BCCI Centre of Excellence in Bengaluru from 30… pic.twitter.com/D000rPOkuI
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 16, 2025
2 अनऑफिशीयल टेस्ट मॅचसाठी दक्षिण आफ्रिका ए टीम : मार्क्स अकरमन (कर्णधार), टेम्बा बावुमा (फक्त दुसऱ्या सामन्यासाठी), ओकुहले सेले, झुबेर हमझा, जॉर्डन हरमन, रुबिन हरमन, रिवाल्डो मूनसामी, त्शेपो मोरेकी, मिहलाली मपोंगवाना, लेसेगो सेनोकवाने, प्रिनेलन सुब्रेन, काइल सिमंड्स, त्सेपो एन्डवांडवा, जेसन स्मिथ, टियान व्हॅन वुरेन, कोडी युसुफ.
अनऑफिशियल वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका ए टीम : मार्केस अकरमन (कर्णधार), ओटनील बार्टमन, ब्योर्न फॉर्च्युइन, जॉर्डन हरमन, रुबिन हरमन, क्वेना माफाका, रिवाल्डो मूनसामी, त्शेपो मोरेकी, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, डेलानो पॉटगिएटर, लुआन-द्रे प्रिटोरियस, सिनेथेम्बा केशिले, जेसन स्मिथ आणि कोडी युसुफ.
