AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH च्या गोटात मोठी धुसफूस! अभिषेक शर्मा नाराज; टीम सोडणार असल्याची चर्चा, नेमकं कारण आलं समोर

Sunrisers Hyderabad Abhishek Sharma News: आयपीएल २०२७ च्या आधी सनरायझर्स हैदराबादमधून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिषेक शर्मा नाराज असल्याचे समोर आले आहे.

SRH च्या गोटात मोठी धुसफूस! अभिषेक शर्मा नाराज; टीम सोडणार असल्याची चर्चा, नेमकं कारण आलं समोर
| Updated on: Oct 02, 2026 | 8:28 PM
Share

इंडियन प्रीमियर लीग २०२७ च्या आधी सनरायझर्स हैदराबाद संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा संघ व्यवस्थापनावर नाराज असून त्याला संघ सोडायचा असल्याचे बोलले जात आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ सोडल्यास त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्ससह अनेक संघांमध्ये स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे कर्णधार पॅट कमिन्स आगामी आयपीएल हंगामासाठी उपलब्ध राहणार नसल्याचा चर्चा होत आहे. अशातच इशान किशनकडे संघाची सूत्रे सोपवली जाऊ शकतात. तर अभिषेक शर्मा देखील कर्णधारपदासाठी दावा करत असल्याचे मानले जात आहे. यामुळे आता फ्रँचायझीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

अभिषेक शर्माने अनेक फ्रँचायझींसोबत चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. परंतु अद्याप काहीही ठोस निष्पन्न झालेले नाही. ईशान किशनने कर्णधारपद स्वीकारल्यापासून अभिषेक शर्मा सनरायझर्सवर नाराज आहे, हे आता गुपित राहिलेले नाही. तो बऱ्याच काळापासून या फ्रँचायझीसोबत आहे. कर्णधारपदासाठी त्याच्या स्पष्ट महत्त्वाकांक्षा होत्या. मात्र त्याला ही जबाबदारी न देता इशानकडे सोपवली आहे. यामुळे तो नाराज आहे.

तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांचा संभाव्य पर्याय म्हणून विचार केला जात होता. दिल्ली कॅपिटल्सलाही वगळता येणार नाही. कारण त्याचा मार्गदर्शक युवराज सिंग आता त्या संघाचा भाग आहे. गेल्या हंगामात फ्रँचायझीने किशनकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतल्यापासून संघात परिस्थिती तणावपूर्ण आहे.

सध्या कर्णधारपदाच्या फारशा संधी उपलब्ध नाहीत. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन पर्याय आहेत. पण इतर बहुतेक संघ स्थिर झालेले दिसतात. त्यामुळे सनरायझर्स आणि अभिषेक शर्मा वेगळे होण्यास सहमत झाले तरी, मोठा प्रश्न हाच राहतो की, तो कुठे जाईल? जरी ते वेगळे झाले, तरी सनरायझर्सची भूमिका काय असेल? रोख रकमेचा सौदा? की खेळाडूंची अदलाबदल? यात अनेक घटक गुंतलेले आहेत.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा