सनरायजर्स हैद्राबादकडून वगळण्यात आल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक, इन्स्टा स्टोरीला शेअर केल्या भावना, म्हणाला…

| Updated on: Oct 01, 2021 | 8:09 PM

एकेकाळी सनरायझर्स हैद्राबाद संघाला ट्रॉफी जिंकवून देणारा संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आता मात्र संघाकडून चूकीच्या वागणूकीमुळे कमालीचा भावूक झाला आहे.

सनरायजर्स हैद्राबादकडून वगळण्यात आल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक, इन्स्टा स्टोरीला शेअर केल्या भावना, म्हणाला...
डेव्हिड वॉर्नर
Follow us on

मुंबई : सनरायझर्स हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैद्राबाद संघातील (Sunrisers Hyderabad) नातं आता पहिल्यासारखं राहिलेलं दिसत नाही. एकेकाळी संघातून आयपीएल गाजवलेला वॉर्नर आता संघाच्या बसमध्येही दिसत नसल्याचं समोर येत हे. या हंगामात वॉर्नर यापुढे सनरायझर्सकडून कोणताही सामना खेळणार नसल्याची माहिती InsideSport.co यांनी दिली होती. त्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून डेव्हिड वॉर्नरला वाईट वागणूक मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याला संघाच्या संघासोबत बसमध्ये प्रवासासाठी वगळलं जात, तो डगआऊटमध्येही दिसत नाही, तो टीमच्या हॉटेलमध्येच थांबत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता वॉर्नरही भावूक झाल्याचं समोर आलं आहे.

वॉर्नर आणि हैद्राबाद संघ यांच्यातील नातं बिघडत असल्याचं सातत्याने समोर येत आहे. या सर्वाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा आयपीएल 2021 मध्ये डेव्हिड वॉर्नर हिरोपासून झिरो बनत गेला. वॉर्नरने कर्णधार म्हणून हंगामाची सुरुवात केली. पण आधी त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले आणि आता हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मैदानावर येण्याऐवजी हॉटेलच्या खोलीत राहणे पसंत केले. आता त्याने एक भावूक इन्स्टाग्राम पोस्ट करत त्याच्या भावना शेअर केल्या आहेत.

काय म्हणतोय वॉर्नर?

डेव्हि़डने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तो म्हणतोय की, ”हे महत्त्वाचं नाही की कोण तुमच्या समोर खरेपणाने वागतं. हे महत्त्वाचं आहे की कोण तुमच्या पाठीवर खरेपणाने वागतं” या पोस्टमधून जणूकाही वॉर्नर हैद्राबाद संघ प्रशासनालाच त्याच्या भावना बोलून दाखवत आहे, असचं प्रतित होत आहे.

हीच ती डेव्हीड वॉर्नरची इन्स्टाग्राम स्टोरी

पुढच्या वर्षी वॉर्नर नव्या संघात दिसणार?

सूत्रांनी पुढे सांगितले, “पुढील हंगामासाठी नवीन लिलाव होणार आहे. सर्व संघ पुन्हा नव्याने सुरू होतील. गेल्या 2 हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खराब राहिली आहे. त्यामुळे ऑरेंज आर्मीलाही एक उत्तम संघ बनवण्याची संधी मिळणार आहे. वॉर्नर आणि SRH ने याआधी चांगलं प्रदर्शन केलं आहे. परंतु आमच्यासाठी नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे.”

IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात संघ आणि वॉर्नरमध्ये मतभेद

आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातही वॉर्नर आणि संघ व्यवस्थापनामध्ये वाद झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि कर्णधारपद केन विल्यमसनकडे सोपवण्यात आले. आता आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात सलग दोन सामन्यांमध्ये वॉर्नरच्या अपयशानंतर जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले. वॉर्नर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात 2 धावांवर बाद झाला. त्यानंत कालच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही.

हे ही वाचा

IPL 2021: …म्हणून हार्दीक पंड्या गोलंदाजी करत नाही, मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक जयवर्धनेने सांगितलं कारण

ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

(SRH team Bad behavior with David Warner made him emotional shares Emotions in insta story)