AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नर आणि SRH च्या पुढच्या वाटा वेगळ्या, माजी कर्णधाराला संघात स्थान नाही?

पुढील हंगामासाठी नवीन लिलाव होणार आहे. सर्व संघ पुन्हा नव्याने सुरू होतील. गेल्या 2 हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खराब राहिली आहे. त्यामुळे ऑरेंज आर्मीलाही एक उत्तम संघ बनवण्याची संधी मिळणार आहे.

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नर आणि SRH च्या पुढच्या वाटा वेगळ्या, माजी कर्णधाराला संघात स्थान नाही?
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 28, 2021 | 10:41 AM
Share

मुंबई : शेवटी जे व्हायचे होते तेच झाले. कारण डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) मार्ग वेगळे झाले आहेत. त्यांच्यातील मतभेदाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. या हंगामात वॉर्नर यापुढे सनरायझर्सकडून कोणताही सामना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. InsideSport.co च्या मते, हा निर्णय खेळाडू आणि फ्रँचायझी दोघांनी परस्पर मान्य केला आहे. (IPL 2021: David Warner & Sunrisers Hyderabad goodbye to each other, former captain has no place in the team?)

वॉर्नर आणि हैदराबाद संघ या दोघांमधील दीर्घ सहवास आता संपला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मालिकेची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा आयपीएल 2021 मध्ये डेव्हिड वॉर्नर हिरोपासून झिरो बनत गेला. वॉर्नरने कर्णधार म्हणून हंगामाची सुरुवात केली. पण आधी त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले आणि आता हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मैदानावर येण्याऐवजी हॉटेलच्या खोलीत राहणे पसंत केले.

सूत्रांनी पुढे सांगितले, “पुढील हंगामासाठी नवीन लिलाव होणार आहे. सर्व संघ पुन्हा नव्याने सुरू होतील. गेल्या 2 हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खराब राहिली आहे. त्यामुळे ऑरेंज आर्मीलाही एक उत्तम संघ बनवण्याची संधी मिळणार आहे. वॉर्नर आणि SRH ने याआधी चांगलं प्रदर्शन केलं आहे. परंतु आमच्यासाठी नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे.”

IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात संघ आणि वॉर्नरमध्ये मतभेद

आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातही वॉर्नर आणि संघ व्यवस्थापनामध्ये वाद झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि कर्णधारपद केन विल्यमसनकडे सोपवण्यात आले. आता आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात सलग दोन सामन्यांमध्ये वॉर्नरच्या अपयशानंतर जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले. वॉर्नर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात 2 धावांवर बाद झाला. त्यानंत कालच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही.

अखेर सनरायजर्सचा ‘विजयी सूर्य’ उगवला

आयपीएलच्या (IPL 2021) 40 व्या सामन्यात गुणतालिकेत खालच्या स्थानांवर असलेल्या सनरायजर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) या संघात टक्कर होती. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात हैद्राबादने राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात बऱ्याच दिवसानंतर हैद्राबाद संघात पुनरागमन झालेल्या जेसन रॉय (Jason Roy) आणि कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) यांची अर्धशतकं हैद्राबादच्या विजयात महत्त्वाची ठरली. सामन्यात सुरुवातीला फलंदाजी घेतलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने कर्णधार संजू सॅमसनच्या (Sanju Samson) अर्धशतकाच्या जोरावर 164 धावांपर्यंत मजल मारली होती. संजूने तुफान खेळी केली. पण त्याला इतर खेळाडूंची सोबत मात्र मिळाली नाही. ज्यानंतर हैद्राबादकडून मात्र सलामीवीर जेसन रॉयने (Jason Roy) अर्धशतक ठोकल्यानंतर अखेरच्या काही षटकात कर्णधार केनने अर्धशतक ठोकत संघाला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.

जेसन रॉयचं दमदार अर्धशतक

आज हैद्राबाद संघानं मिळवलेल्या विजयात महत्त्वाची कामगिरी सलामीवीर जेसन रॉय याची होती. उशीरा संघात दाखल झालेल्या जेसन रॉयकडून जी अपेक्षा होती तशीच धमाकेदार कामगिरी त्याने केली आहे. त्याने दमदार असं अर्धशतक ठोकत संघाला एक उत्तम सुरुवात करुन दिली. रॉयने 42 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार ठोकत 60 धावा केल्या.

केनने फिनिश केला सामना

चांगल्या लयीत असलेला जेसन रॉय बाद झाल्यानंतर हैद्राबादचा युवा फलंदाज प्रियम गार्गही शून्यावर बाद झाला. ज्यानंतर संघ अडचणीत सापडला आहे असे वाटत होते. पण त्याचवेळी जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज केन विल्यमसनने हैद्राबाद संघाचा कर्णधार असल्याचं कर्तव्य बजावर अप्रतिम असं नाबा 51 धावांच अर्धशतक ठोकतं सामना जिंकवून दिला. त्याला अभिषेक शर्माने नाबाद 21 धावांची उत्तम साथ दिली. ज्यानंतर हैद्राबादने 7 विकेट्सने राजस्थानवर विजय मिळवला.

हे ही वाचा

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO

IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती

(IPL 2021: David Warner & Sunrisers Hyderabad goodbye to each other, former captain has no place in the team?)

Follow Us
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे