SRH vs PBKS Toss : पंजाबचा बॉलिंगचा निर्णय, हैदराबादच्या सलामी जोडीला रोखण्याचं आव्हान
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Toss and Playing 11 : सनरायजर्स हैदराबाद टीमला घरच्या मैदानात पंजाब किंग्स विरुद्ध बॅटिंगची संधी मिळाली आहे. हैदराबादची सलामी आणि विस्फोटक जोडी कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वातील 49 व्या सामन्यात पॉइंट्स टेबलमधील 2 यशस्वी संघ आमेनसामने आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचं आव्हान आहे. उभयसंघातील सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन श्रेयस अय्यर याने फिल्डिंगचा निर्णय करत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आता पंजाबचे गोलंदाज हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीला स्वस्तात रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंजाब आणि हैदराबाद दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. नितीश कुमार रेड्डी याचं सनरायजर्स हैदराबादच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे. तर पंजाबच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये शशांक सिंह आणि लॉकी फर्ग्यूसन परतले आहेत.
एसआरएचचे हैदराबादमधील पंजाब विरुद्धचे आकडे
एसआरचने हैदराबादमध्ये पंजाब विरुद्ध 10 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाबला 1 सामनाच जिंकता आला आहे. आकडे पाहिल्यास हैदराबाद घरच्या मैदानात पंजाबवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे पंजाब 11 व्या सामन्यात हैदराबादला दुसऱ्यांदा पराभूत करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजीव गांधी स्टेडियममधील आकडेवारी
राजीव गांधी स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या 5 पैकी 3 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने मैदान मारलं आहे.
नंबर 1 साठी लढाई
दरम्यान पंजाब आणि हैदराबाद दोन्ही संघात पॉइंट्स टेबलमधील पहिल्या नंबरसाठी ही लढाई आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 6-6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता कोणता संघ या मोहिमेतील आपला सातवा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 स्थान पटकावतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, एशान मलिंगा आणि साकिब हुसैन.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, लॉकी फर्ग्युसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.