AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs PBKS Match Result IPL 2022: सुरुवात आणि डेथ ओव्हर्समध्ये पंजाब किंग्सचा घात झाला, SRH चा विजयी चौकार

SRH vs PBKS Match Result IPL 2022: पहिल्या दोन पराभवानंतर सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाबद्दल प्रश्नचिन्हा उपस्थित करण्यात आलं होतं. पण या संघाने जोरदार कमबॅक करत टीकाकारांची तोंड बंद केली.

SRH vs PBKS Match Result IPL 2022: सुरुवात आणि डेथ ओव्हर्समध्ये पंजाब किंग्सचा घात झाला, SRH चा विजयी चौकार
SRH चा विजयी चौकार Image Credit source: PTI
| Updated on: Apr 17, 2022 | 7:31 PM
Share

मुंबई: पहिल्या दोन पराभवानंतर सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाबद्दल प्रश्नचिन्हा उपस्थित करण्यात आलं होतं. पण या संघाने जोरदार कमबॅक करत टीकाकारांची तोंड बंद केली. सनरायजर्स हैदराबादने रविवारी पंजाब किंग्सला (Punjab kings) नमवून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव 151 धावात आटोपला. सनरायजर्स हैदराबादने अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, (Rahul Tripathi) एडन मार्कराम आणि निकोलस पूरन यांच्या झुंजार खेळाच्या बळावर विजय मिळवला. SRH ने सात विकेट आणि सात चेंडू राखून विजय मिळवला. सनरायजर्स हैदराबादचा सहा सामन्यातील चौथा आणि पंजाब किंग्सचा सहा सामन्यातील तिसरा पराभव आहे. एसआरएचचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आज भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. त्याने प्रतितास 150 किमीच्या वेगाने गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 28 धावा देत चार विकेट काढल्या.

  1. पंजाब किंग्सला आज चांगली सुरुवात मिळू शकली नाही. शिखर धवन (8), प्रभसिमरने सिंह (14) आणि जॉनी बेयरस्टो (12) स्वस्तात लवकर आऊट झाले. लियाम लिव्हिंगस्टोन (60) आणि शाहरुख खानचा (26) अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराश केलं.
  2. लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरुख खान खेळपट्टीवर असेपर्यंत धावा वेगाने निघाल्या. चार बाद 61 वरुन दोघांनी डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. पण शाहरुख खान आऊट झाल्यानंतर वेगाने धावा निघाल्या नाहीत. शेवटच्या दोन-तीन षटकात फार धावा झाल्या नाहीत. शेवटच्या ओव्हरमध्ये तर चार विकेट गेल्या. डेथ ओव्हर्समध्ये धावा झाल्या नाहीत, त्याचा फटका पंजाबला बसला.
  3. विजयासाठी 152 धावांचे लक्ष्य असल्याने सनरायजर्स हैदराबादने आरामात फलंदाजी केली. केन विलियमसनचा विकेट लवकर मिळाला. पण अभिषेक शर्मा-राहुल त्रिपाठीने सहज धावा बनवल्या. अभिषेकने 25 चेंडूत 31 आणि राहुलने 22 चेंडूत 34 धावा केल्या. दुसऱ्य़ा विकेटसाठी दोघांनी 52 धावांची भागीदारी केली.
  4. राहुल-अभिषेक बाद झाल्यानंतर एडन मार्कराम आणि निकोलस पूरनने सहजतेने धावा जमवल्या. मार्करामने 27 चेंडूत नाबाद 41 आणि पूरनने 30 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. मार्कराने षटकार ठोकून SRH च्या चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चौथ्या विकेटसाठी त्यांनी नाबाद 75 धावांची भागीदारी केली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.