AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 आधी होणाऱ्या टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, मोहम्मद शिराजच्या पदरी पुन्हा निराशा

Zimbabwe vs Sri Lanka T20i Series Schedule : श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर 3 सामन्यांची टी 20i मालिका होणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.

Asia Cup 2025 आधी होणाऱ्या टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, मोहम्मद शिराजच्या पदरी पुन्हा निराशा
Asia Cup TrophyImage Credit source: Bcci and Tv9
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 28, 2025 | 2:57 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी आतापर्यंत 8 पैकी 6 संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर यजमान यूएई आणि श्रीलंकेने संघ जाहीर केलेला नाही. यूएई आशिया कपआधी टी 20 ट्राय सीरिजमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका आशिया कपआधी झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका होणार आहे. उभयसंघात 2 एकदिवसीय आणि 3 टी 20i सामने होणार आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय मालिकेनंतर  टी 20i सीरिजसाठी टीम जाहीर केली आहे.

श्रीलंकेने टी 20i मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. चरिथ असलंका हाच एकदिवसीय आणि टी 20i संघाचं नेतृत्व करणार आहे.

मोहम्मद शिराजला संधी नाहीच

निवड समिताने 2 सामन्यांच्या एकदिवससीय मालिकेसाठी संघ जाहीर केला होता. तेव्हा मोहम्मद शिराज याला संधी दिली नव्हती. तसेच आताही निवड समितीने शिराजचा टी 20i मालिकेसाठी विचार केलेला नाही. त्यामुळे मोहम्मद शिराजला आणखी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

श्रीलंकेचा झिंबाव्वे दौरा

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 3 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब

दुसरा सामना, 6 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब

तिसरा सामना, 7 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब

झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडीस, कुसल परेरा, नाविंदु फर्नांडो, कामेंदु मेंडीस, कामिल मिसारा, विशेल हलमबागे, दासुन शनाका, दुनिथ वेलालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, दुष्मंता हेमंथा, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुआन तुषारा आणि मथीशा पथिराना.

निर्णायक मालिका

दरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूंसाठी ही निर्णायक मालिका असणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आशिया कपसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे निवड समिती या मालिकेनंतरच आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करु शकते. या मालिकेत दमदार कामगिरी खेळाडूंना आशिया कपसाठी संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा धमाकेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

Follow Us
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा