AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

W,W,W, महीश थीक्षाणाचा कारनामा, न्यूझीलंडविरुद्ध Hat Trick, पाहा व्हीडिओ

Maheesh Theekshana Hat Trick Video : महीश थीक्षना याने इतिहास घडवला आहे. महीश थीक्षना याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे.

W,W,W, महीश थीक्षाणाचा कारनामा, न्यूझीलंडविरुद्ध Hat Trick, पाहा व्हीडिओ
Maheesh Theekshana Hat Trick
| Updated on: Jan 08, 2025 | 3:23 PM
Share

श्रीलंकेचा फिरकीपटू महीश थीक्षाणा याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास घडवला आहे.महीशने दुसर्‍या सामन्यातील पहिल्या डावात बॉलिंग करताना हॅटट्रिक घेतली आहे. महीश यासह 2025 वर्षात हॅटट्रिक घेणारा पहिलावहिला गोलंदाज ठरला आहे. महीशने या हॅटट्रिकसह न्यूझीलंडच्या धावांना ब्रेक लावला. महीशने हॅटट्रिक घेत काही विक्रमही केले आहेत. महीशने नक्की काय काय केलंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.

श्रीलंकेने सीडन पार्क हॅमिल्टन येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पावसाच्या व्यत्ययामुळे एकूण 13 षटकांचा वेळ व्यर्थ गेल्याने सामना 37 ओव्हरचा करण्याचा निर्णय करण्यात आला. महीशने हॅटट्रिक घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं.

महीशने 35 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूत 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 37 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर महीशने विकेट घेत हॅटट्रिक घेतली. महीशने मिचेल सँटनर आणि नॅथन स्मिथ या दोघांना 35 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 बॉलवर आऊट केलं. त्यानतंर मॅट हेन्री याला 37 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर आऊट करत महीशने पहिलीवहिली हॅटट्रिक मिळवली. महीशने एकूण 8 ओव्हरमध्ये 5.50 च्या स्ट्राईक रेटने 44 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेचा सातवा हॅटट्रिकवीर

महीश श्रीलंकेकडून वनडेत हॅटट्रिक घेणारा एकूण सातवा गोलंदाज ठरला आहे. तसेच महीश वनडेत न्यूझीलंडविरुद्ध सलग 3 चेंडूत 3 विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. महीश न्यूझीलंडविरुद्ध वनडेत 2013 नंतर हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. रुबेल हौसेन याने याआधी 2013 साली न्यूझीलंडविरुद्ध ढाक्यात हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.

हॅटट्रिक

श्रीलंकेसाठी वनडेत हॅटट्रिक घेणारे बॉलर

  • चमिंडा वास, विरुद्ध झिंबाब्वे आणि बांग्लादेश
  • लसिथ मलिंगा, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केन्या आणि ऑस्ट्रेलिया
  • परवेझ महारुफ, विरुद्ध भारत
  • थिसारा परेरा, विरुद्ध पाकिस्तान
  • वानिंदु हसरंगा, विरुद्ध झिंबाब्वे
  • शाहीन मदुशका, विरुद्ध बांग्लादेश
  • महीश थीक्षणा, विरुद्ध न्यूझीलंड

न्यूझीलंडविरुद्ध वनडेत हॅटट्रिक

  • ब्रुस रीड, सिडनी, 1986
  • चेतन शर्मा, नागपूर, 1987
  • वकार युनूस, इस्ट लंडन, 1994
  • रुबेल हौसेन, ढाका, 2013
  • महीश थीक्षणा, हॅमिल्टन, 2025

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी आणि विल्यम ओरर्के.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, महीश थीक्षाना, एशान मलिंगा आणि अशिशा.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.