AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगच सावट, ‘या’ टीमवर आरोप, ICC ला चौकशीच निमंत्रण

कधी झाली फिक्सिंग? थेट संसदेत आरोप

क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगच सावट, 'या' टीमवर आरोप, ICC ला चौकशीच निमंत्रण
cricket Image Credit source: (PC-GETTY IMAGES)
| Updated on: Nov 24, 2022 | 1:17 PM
Share

कोलंबो: क्रिकेट पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगच्या सावटाखाली आहे. थेट पाकिस्तानी टीमच्या एका सीरीजवर मॅच फिक्सिंगचा आरोप झालाय. याआधी सुद्धा पाकिस्तानी टीम मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये अडकली आहे. पाकिस्तानी टीम काही महिन्यांपूर्वी एक टेस्ट सीरीज खेळली. त्यावर फिक्सिंगचा आरोप होतोय.

थेट संसदेत झाला आरोप

श्रीलंका-पाकिस्तान टेस्ट सीरीजमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप होतोय. ही कसोटी मालिका 1-1 अशी ड्रॉ झाली होती. श्रीलंकेच्या एका मोठ्या नेत्याने तिथल्या संसदेत आरोप केलाय. पाकिस्तान-श्रीलंका टेस्ट सीरीजमध्ये फिक्सिंग झाली होती, असं या नेत्याच म्हणणं आहे.

श्रीलंकन बोर्डाने तात्काळ उचललं हे पाऊल

या आरोपांनंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आयसीसीला टेस्ट सीरीजच्या चौकशीच निमंत्रण दिलं आहे. पाकिस्तानी टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. तिथे 1-1 ने कसोटी मालिका ड्रॉ झाली.

कोणी कुठली कसोटी जिंकली?

या टेस्ट सीरीजमध्ये पाकिस्तानच्या टीमने गॉलमध्ये पहिला कसोटी सामना 4 विकेटने जिंकला होता. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रीलंकेच्य़ा टीमने पुनरागमन केलं. 246 धावांनी श्रीलंकेने ही टेस्ट सीरीज जिंकली.

पीसीबीने या आरोपांवर अजून काही उत्तर दिलेलं नाही. श्रीलंका किंवा आयसीसीकडून या विषयावर अजून कोणतीही सूचना मिळालेली नाही, असं पीसीबी अधिकाऱ्याने सांगितलं. त्यामुळे या विषयावर ते काही बोलू शकत नाहीत.

Follow Us
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा