विराट, विल्यमसन नाही तर ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथचा ‘फेव्हरेट’, म्हणतो हा तर जगात सर्वोत्कृष्ट

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याच्यामते जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असणाऱ्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.

विराट, विल्यमसन नाही तर 'हा' भारतीय क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथचा 'फेव्हरेट', म्हणतो हा तर जगात सर्वोत्कृष्ट
स्टिव्ह स्मिथ

सिडनी : सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये ‘क्लासिक’ फलंदाज म्हटलं तर विराट कोहली (Virat Kohli), केन विलियमसन (Kane Williamson), जो रूट (Joe Root) आणि स्टीव स्मिथ (Steve Smith) या चौघांच नाव समोर येतो. आपआपल्या देशाचे बेस्ट फलंदाज असणारे हे चौघे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याचे सर्वोत्कृष्ठ फलंदाज आहे. पण यांच्याती एकाला म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला त्याच्या मते जगातील बेस्ट फलंदाज विचारल्यावर त्याने ज्याच नाव घेतलं तो भारतीय खेळाडूच आहे. पण ते नाव विराट कोहली नसून सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे आहे.

स्टीव्ह स्मिथ इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. यावेळी तो ज्याही फलंदाजाविरुद्ध आतापर्यंत खेळला आहे. त्याच्यामध्ये सचिन तेंडूलकर सर्वोत्कृष्ठ आहे, असं उत्तर स्मिथनं दिलं आहे. त्याने सचिनला बेस्ट म्हणण्यामागील कारणही सांगितलं. सचिनने त्याच्या कारकिर्दीत मॅक्ग्रा, अख्तर, अकरम, अँडरसन, वॉर्न, मुरलीथरन सारख्या सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध रेकॉर्ड्स रचले असल्याने तो एक दिग्गज आणि बेस्ट फलंजदाज आहे असं स्मिथ म्हणाला.

Steve Smith ans on Instagram

स्टीव्ह स्मिथने इन्स्टाग्रामवर दिलेले उत्तर

स्मिथने घेतली आहे सचिनची विकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मिथचं पदार्पण सचिन निवृत्त होण्यापूर्वी झालं होतं. 2010 मध्ये स्मिथने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यावेळी फलंदाजीसह पार्ट टाइम लेग स्पिनर असणाऱ्या स्मिथने एकदा सचिनलाही बाद केलं होतं. मोहाली येथील एका टेस्टमध्ये स्मिथने सचिनला 37 धावांवर बाद केलं होतं. सामना मात्र भारत 6 विकेट्सनी जिंकला होता.

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(Steve Smith Says Sachin Tendulkar is Best Batsman of all time)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI