AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stuart Broad : युवराजने मारलेले 6 सिक्स सोडा, ब्रॉडच्या नावावर आहेत ‘हे’ खरतनाक रेकॉर्ड

२००६ साली पदार्पण केलेल्या स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी कारकिर्द १७ वर्षांची राहिली. या काळात त्याने अनेक विक्रम रचले आहेत. यामधील काही रेकॉर्ड असे आहेत जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Stuart Broad : युवराजने मारलेले 6 सिक्स सोडा, ब्रॉडच्या नावावर आहेत 'हे' खरतनाक रेकॉर्ड
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 30, 2023 | 8:47 AM
Share

मुंबई : इंग्लंड संघाचा खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड याने (Stuart Broad Retirement) अचानक शनिवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या क्रिकेट निवृत्तीची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Stuart Broad Retirement) अॅशेसमधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर ब्रॉडने याबाबत माहिती दिली. भारतीय क्रिकेट चाहत्यांना ब्रॉडची काही वेगळी ओळख करून द्यायला नको. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने टी-२० वर्ल्ड कपमध्ये मारलेले सलग सहा सिक्सर सर्वांना माहितीच असतील,  युवीने ज्या बॉलरला धुतलं होतं तो ब्रॉडच होता.

२००६ साली पदार्पण केलेल्या स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी कारकिर्द १७ वर्षांची राहिली. या काळात त्याने अनेक विक्रम रचले आणि संघाच्या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिक बजावली. युवीने त्याला मारलेले सिक्स सर्वांना माहित असतील मात्र ब्रॉडने असे काही विक्रम केले आहेत जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अॅशेसमध्ये फास्टर बॉलरने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम ब्रॉडच्या नावावर आहे. २०१५ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने १५ धावा घेत ८ विकेट्स घेतल्या होत्या. अशी कामगिरी करणारा अॅशेसमधील तो एकमेव गोलंदाज आहे.

स्टुअर्ट ब्रॉड याने कसोटीमध्ये दोनवेळा हॅट्रीक घेणाऱ्या चार गोलंदाजांपैकी आहे. वसीम अक्रमनंतर दोन कसोटी हॅट्रीक घेणारा तो बॉवर आहे. २०११ आणि २०१४ मध्ये त्याने श्रीलंका संघाविरूद्ध हा विक्रम केला होता.

स्टुअर्ट ब्रॉड हा कसोटी क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. ब्रॉडने एका ओव्हरमध्ये ३५ धावा केल्या होत्या. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धावा ठोकल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमध्ये ६०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा जगातील ब्रॉड हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. १६७ सामन्यांमध्ये ६०२ विकेट्स घेतल्या आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल