AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard : सनरायजर्स हैदराबाद आपल्या घरच्या मैदानात यलो आर्मी अर्थात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. दोन्ही संघांमध्ये तिसरा विजय मिळवण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?
SRH vs CSK IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 18, 2026 | 3:37 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शनिवारी 18 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 27 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या 19 व्या पर्वातील सहावा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 5 पैकी प्रत्येकी 3 सामने गमावले आहेत. तर 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे मोहिमेतील सहाव्या सामन्यात तिसरा सामना जिंकण्यासाठी चेन्नई आणि हैदराबादमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. इशान किशन याच्याकडे हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर ऋतुराज गायकवाड सीएसकेचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता कॅप्टन आपल्या संघाला विजयी करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याची वेळ आणि ठिकाण जाणून घेऊयात.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना शनिवारी 18 एप्रिलला होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद इथे होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

सनरायजर्स हैदराबाद सरस की चेन्नई सुपर किंग्स भारी?

हैदराबाद आणि चेन्नई या दोघांनी एकमेकांविरुद्ध खेळण्याची 23 वी वेळ ठरणार आहे. याआधी उभयसंघात एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. चेन्नई हैदराबाद विरुद्ध सरस असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. चेन्नईने 22 पैकी 15 वेळा हैदराबादचा धुव्वा उडवला आहे. तर हैदराबादला चेन्नई विरुद्ध 7 सामन्यांत विजयी होता आलंय.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

दरम्यान हैदराबाद आणि चेन्नई दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले असल्याने त्यांच्या खात्यात 4-4 गुण आहेत. मात्र नेट रनरेटच्या फरकामुळे हैदराबाद चेन्नईच्या तुलनेत पॉइंट्स टेबलमध्ये पुढे आहे. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा +0.576 असा आहे. तर चेन्नई शेवटून तिसऱ्या अर्थात आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा 0.846 इतका आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...