AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियातून वगळलं, सूर्यकुमार यादवने व्यक्त केल्या अशा भावना

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून पूर्वसंध्येला कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपल्या भावना व्यक्त केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतही त्याने आपलं मत व्यक्त केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियातून वगळलं, सूर्यकुमार यादवने व्यक्त केल्या अशा भावना
| Updated on: Jan 21, 2025 | 6:57 PM
Share

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पण टी20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळण्यात आलं आहे. टी20 फॉर्मेटमध्ये भलेभले गोलंदाज सूर्यकुमारला घाबरतात. पण या उलट चित्र वनडे मालिकेत पाहायला मिळतं. 37 वनडेत त्याने मधल्या फळीत फलंदाजी करतना 25.76 च्या सरासरीने 773 धावा केल्या आहेत. याबाबत सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले. यावर सूर्यकुमार यादवने दिलखुलासपणे उत्तर दिलं. त्याला विचारलं की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात निवड झाली नाही याचं दु:ख वाटलं का? तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘यामुळे दु:ख का होईल? मी जर चांगली कामगिरी करत असतो तर मी चम्पियन्स ट्रॉफीत असतो. जर मी चांगली कामगिरी करत नाही तर ते स्वीकार करणं आवश्यक आहे. जर तुम्ही टीम पाहाल तर खरंच चांगली आहे. जे पण संघात आहेत ते चांगली कामगिरी करत आहेत. त्यांनी भारतासाठी त्या फॉर्मेटमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मी त्यांच्यासाठी खूश आहे.’

‘पण मी चांगली कामगिरी करू शकलो नाही, याचा विचार करून वाईट वाटतं. जर मी चांगली कामगिरी केली असती तर नक्कीच तिथे असतो. जर मी चांगली कामगिरी करत नाही तर चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूची निवड होणं हा त्याचा हक्क आहे.’, असंही सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला. दरम्यान, सूर्यकुमार यादवने मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहबाबतही आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘मी त्यांच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. ते अनुभवी गोलंदाज आहेत. जेव्हा भारतासाठी खेळतात तेव्हा वेगळीच भावना असते. अतिरिक्त जबाबदारी आणि खेळणं पसंत करतात. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एकत्रित गोलंदाजी करताना पाहणं मजेशीर असेल. आपण हे 2023 वनडे वर्ल्डकपमध्ये पाहिलं आहे. त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली. आशा आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीतह तसंच पाहायला मिळेल.’, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.

Follow Us
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.