AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL नंतर SMAT मध्ये ऋतुराज गायकडवाडचा धुमाकूळ, लागोपाठ दुसरं अर्धशतक, महाराष्ट्राची पंजाबवर मात

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचा कर्णधार असून सलामीची जबाबदारीही सांभाळत आहे. 5 नोव्हेंबर रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 54 चेंडूत 80 धावांची जबरदस्त खेळी केली आणि महाराष्ट्राला सात विकेटने मोठा विजय मिळवून दिला.

IPL नंतर SMAT मध्ये ऋतुराज गायकडवाडचा धुमाकूळ, लागोपाठ दुसरं अर्धशतक, महाराष्ट्राची पंजाबवर मात
Ruturaj Gaikwad
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 2:27 PM
Share

मुंबई : ऋतुराज गायकवाडने IPL 2021 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली होती. तसेच स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकत त्याने ऑरेंज कॅपदेखील पटकावली होती. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने झंझावाती फलंदाजी करत संघाला चौथ्यांदा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गायकवाडच्या बॅटमधून धावांचा पाऊस अजूनही सुरूच आहे. आता तो सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये चमक दाखवत आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021 : Ruturaj Gaikwad back to back fifty, Maharashtra defeated Punjab)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचा कर्णधार असून सलामीची जबाबदारीही सांभाळत आहे. 5 नोव्हेंबर रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 54 चेंडूत 80 धावांची जबरदस्त खेळी केली आणि महाराष्ट्राला सात विकेटने मोठा विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाला सहा गड्यांच्या मोबदल्यात केवळ 136 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गायकवाडच्या 80 धावांच्या खेळीमुळे महाराष्ट्राने 15 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

लखनौ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पंजाबच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. सलामीवीर शुभमन गिलने 39 चेंडूत 44 आणि गुरकीरत सिंग मानने 32 चेंडूत 41 धावा केल्या. त्यांच्याशिवाय उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. शेवटच्या षटकात सनवीर सिंगने 18 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 28 धावा करत संघाला 137 धावांपर्यंत नेले. पंजाबच्या फलंदाजांना संपूर्ण डावात केवळ पाच चौकार आणि पाच षटकार लगावता आले. महाराष्ट्रातून दिव्यांग हिमगणेकर सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने चार षटकांत 17 धावा देत दोन बळी घेतले. आशय पालकरने 2 आणि मुकेश चौधरीने एक गडी बाद केला.

अर्ध्याहून अधिक धावा एकड्या ऋतुराजने फटकावल्या

लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा सलामीवीर यश नाहर खातं न उघडता बाद झाला. मात्र ऋतुराज गायकवाडने नौशाद शेखसह (23) दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करत संघाला सहज विजयाच्या मार्गावर आणले. तिसरी विकेट म्हणून 17 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गायकवाड सिद्धार्थ कौलचा बळी ठरला, मात्र तोपर्यंत महाराष्ट्राचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. गायकवाडने 54 चेंडूंचा सामना करत आठ चौकार आणि तीन षटकारांसह 80 धावा केल्या. अझीम काझीने 26 चेंडूत नाबाद 28 धावा करत संघाला लक्ष्याच्या पलीकडे नेले.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये पंजाबचा पहिला पराभव झाला. पहिला सामना त्यांनी जिंकला होता. त्याचवेळी पहिल्या सामन्यातील पराभवातून सावरत महाराष्ट्राने विजयाचे खाते उघडले. त्याचवेळी ऋतुराजने या स्पर्धेत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. तामिळनाडूविरुद्ध त्याने 51 धावांची खेळी खेळली होती.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपनंतर 18 वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणार, ICC च्या 3 ट्रॉफी जिंकणाऱ्या चॅम्पियन्सची मोठी घोषणा

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

(Syed Mushtaq Ali Trophy 2021 : Ruturaj Gaikwad back to back fifty, Maharashtra defeated Punjab)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.