IND vs ENG, Semi Final : टीम इंडियाने 253 धावा करत नोंदवले इतके विक्रम, नॉकआऊट सामन्यात काय घडलं?

भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा वरचष्मा दिसला. भारताने पहिल्या डावात 253 धावा करत इंग्लंडसमोर मोठं आव्हान ठेवलं आहे. तसेच विक्रमही नोंदवले आहे.

IND vs ENG, Semi Final : टीम इंडियाने 253 धावा करत नोंदवले इतके विक्रम, नॉकआऊट सामन्यात काय घडलं?
IND vs ENG, Semi Final : टीम इंडियाने 253 धावा करत नोंदवले इतके विक्रम, नॉकआऊट सामन्यात काय घडलं?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 05, 2026 | 9:09 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत इंग्लंड आमनासामना होत आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौलाबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावेल असं सांगितलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या डावात दव पडत आणि गोलंदाजी करणं कठीण होतं. त्यामुळे संघावर दबाव वाढतो. पण नाणेफेकीचा कौल हा काय भारताच्या बाजूने लागला नाही. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवला निर्णयाबाबत विचारलं तेव्हा त्याने आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची होती असं उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराने सर्वच आवाक् झाले होते. पण पहिल्या डावातील 20 षटकांचा खेळ संपला तेव्हा त्याचं म्हणणं योग्यच होतं असं म्हणावं लागेल. दुसऱ्या डावात दव फॅक्टर पाहता 200 पार धावा झाल्या तर सामना जिंकू शकतो. त्या अनुषंगाने भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी केली. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 253 धावा केल्या आणि विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं. यासह भारताने काही विक्रम नोंदवले आहेत.

इतके सारे विक्रम नोंदवले

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हा चौथा मोठा स्कोअर आहे. यापूर्वी श्रीलंकेने केनियाविरुद्ध 2007 मध्ये 260 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने याच स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध 256 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध 254 धावा केल्या होत्या. तर भारताने इंग्लंडविरुद्ध 253 धावा केल्या आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात एका पर्वात सर्वाधिक षटकारांचा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. भारताने 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 88 षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजने 76, दक्षिण अफ्रिकेने 72 षटकार मारले आहे. त्यामुळे भारतीय अव्वल स्थानी आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील एका डावात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक चौकार षटकार मारण्याचा विक्रम भारताने केला आहे. या डावात भारातने 37 चौकार षटकार मारले. यात 19 षटकार आणि 18 चौकारांचा समावेश आहे. यापूर्वी श्रीलंकेने 2007 मध्ये केनियाविरुद्ध 41 चौकार षटकार मारले आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने सहाव्यांदा 250 पार धावा केल्या आहे. यात आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 5 वेळा ही कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजने 3, झिम्बाब्वेने 3 आणि सरेने 3 वेळा 250 पार धावा केल्या आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संजू सॅमसन अव्वल स्थानी आहे. त्याने उपांत्य फेरीपर्यंत 16 षटकार मारले आहे. रोहित शर्माने 2024 मध्ये 15, शिवम दुबेने 2026 मध्ये 15, इशान किशनने 2026 मध्ये 14, हार्दिका पांड्या 2026 मध्ये 14 आणि युवराज सिंगने 2007 मध्ये 12 षटकार मारले आहेत.

Follow Us